पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/108

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. अहो सुशांता ! ज्ञानकरा ! धर्मार्थ-काम-मोक्षदायका ! निर्जीव भित्तिप्रचालका ! योग-कला-निपुणा ! अलंकापुरवासी श्री विष्णुरूपा ज्ञानदेव संता ! धन्य ! धन्य हा आजचा सुदीन ! कीं तुह्मां समर्थांचे चरण दृष्टीने पाहण्याकरितां मीं काळवंचना करून हा माझा देह आज चौदाशे वर्षे वांचविला, तो माझा मनोरथ आज परिपूर्ण होऊन, मी आपल्या संतमूर्ति आज डोळे भरून पाहिल्या! सद्गुरुनाथा, आपलें केवढे हे अगाध सामर्थ्य! की आपल्या क्षेमालिंगनस्पर्शाने मला अष्टभाव दाटून, माझ्या हृदयांत सर्व विश्व चराचरी भरून राहिलेले चैतन्य एकदम जागृत होऊन, मला सर्वभूतीं परमेश्वर दिहूं लागला ! अहो समर्था, तुमच्या दर्शनाने माझे पूर्व दग्ध होऊन, माझे पुढील जन्माचे बिरडे तुटलें ! आणि आपल्या ह्या साक्षात् प्रभुदर्शनाने माझ्या अभिमानाचे निरसन होऊन, माझे चित्त शुद्ध झालें । माझे पूर्वपुण्य उदयास आल्यामुळे मला आज सद्गुरुचरणतीर्थी स्नान घडून मी पापमुक्त झालों ! आणि मी आजपर्यंत साधलेले योग सफल होऊन मी सनाथ झालों ! सद्गुरुचरणांवर मी आपले मस्तक अनन्यभावाने ठेविले आहे. तरी सद्गुरूंनी माझ्या मस्तकावर अभय हस्त ठेवून आणि मला आपल्या शिष्यवर्गात घेऊन, कृतार्थ करावें ! ज्ञानेश्वर-अहो चांगदेव श्रेष्ठा ! तुह्मी ज्ञाते, वडील; आह्मी अज्ञ, लहान लेकरें ! शिवाय आम्ही ना ब्राम्हण, ना शूद्र, ना वैश्य ! आम्हांला वर्णविचार नाहीं ! तेव्हा तुम्हांसारख्या वर्णश्रेछांना आह्मीं काय सांगणार ? पण तुमची इच्छाच आहे तर माझं तुम्हांपाशीं इतकेच मागणे आहे की, हीच तुमची परब्रह्मस्वरूपी जडलेली चित्तवृत्त सदैव अशीच कायम ठेवा ! ह्मणजे तुमच्या इंद्रियांना विश्रांतसुख मिळेल! मी पाठविलेल्या पासष्टीचा अर्थ तुह्मी पूर्णपणे ध्यानीं आणा, ह्मणजे तुमची तुम्हाला ओळख पटून, अखंड समाधिसुखांत तुह्मी निमग्न व्हाल ! आणि असे झाले ह्मणजे मंदबुद्धीने जी दंभोपाधि तुह्मीं आपल्यामागे लावून घेतली आहे, त्या उपाधींतून तुमची मुक्तता हाऊन तुम्ही जीवन्मुक्त व्हाल ! बाळ मुक्ताबाई, या चांगदेव