पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/109

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. ९९ श्रेष्ठांना मी तुमच्या हाती निरवीत आहे, तरी यांना आत्मज्ञानाचा बोध करुन यांचा द्वैतभाव समूळ नष्ट करावा ! मुक्ताबाई- चांगदेवा, मुक्तपणे सांगदेवोहोयदेवांग ॥ मीपणे उद्वेगनेघेरया ॥१॥ वाउमीपणआथिलॅप्रवीण ॥ एकनारायणतत्वखरें ॥ ध्रु०॥ मुक्तामुक्तीदोन्हीकरीकारेसिशीराणी ॥ द्वैताची काहाणीनाहींतुज ॥ २॥ मुक्ताईअद्वैतद्वैतींद्वैतातात ॥ अवघाचिअनंतदिसदेहीं ॥ ३ ॥ चांगदेव- ( मुक्ताबाईपुढे दंडवत घालतात. तेव्हां मुक्ताबाई त्यांचे मस्तकावर हात ठेविते. ) मातोश्री मुक्ताबाई, चौदाशे वर्षे । भूमिगत असलेल्या धनाचा ठेवा तुम्ही आज माझ्या हातीं देऊन मला धन्य केलें ! माते।श्री, आजपर्यंत मी ऋद्धिसिद्धि वश करून घेऊन गर्वाने ताठून गेलो होतो, परंतु माझ्या मस्तकावर आज आपण वरदहस्त ठेविल्याने माझ्या अहंकाराचा मला पूर्ण विसर पडून, माझ्या हृदयीं चित्स्वरूप पूर्णपणे ठसलें ! अहो माताश्री, मी आजपर्यंत तेरा वेळां योगसिद्धीने काळ फिरविला, आणि चौदा वेळां जन्माला आलों ! परंतु आज या चौदाव्या जन्मीं मी मुक्ताबाई मातोश्रीचा पुत्र झाल्यामुळे, माझ्या मागील सर्व जन्मांचे सार्थक झालें ! तरी मातोश्री, मला ज्ञानदुग्ध पाजून कृतार्थ करावें ! ज्ञानेश्वर- योगीश्रेष्ठा चांगदेवा ! मिथ्या भ्रमाने तुम्ही लौकिकाला भुलून आजपर्यंत सर्वस्वी नाडला गेलां ! तरी योगीराजा, हा मिथ्या भ्रम सांडून सर्वत्र भरलेल्या परब्रह्मस्वरूपाला ज्ञानदृष्टीने ओळखा, झणजे तुमच्या चित्तांत मीतूपणा उरणार नाहीं ! योगसाधन अत्यंत कठीण, आणि ते साध्य झाले तरी ऋद्धिसिद्धि त्याला विन्न करतात ! आणि त्यायोगें योगी आत्मसुखाला अंतरतो ! यासाठी मी तुह्मांला माझ्या अंतरीचे गुज सांगतों कीं, इंद्रियें आणि मन यांना आंवरून धरा, म्हणजे तुह्मी तात्काळ ब्रह्मज्ञानाला ओळखाल ! चांगदेवा, रजोगुण सांडून तमाचे मूळ खंडून टाका; आणि शुद्ध सत्वानें तुह्मी आपल्याला ओळवून घ्या ! तुह्मीं चतुर्दश विद्या, चौसष्ट कला, सप्तकोटी