पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/110

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० श्रीज्ञानेश्वरमहाराज. मंत्र, अष्टादश औषधीरसायणे आणि अनेक योगसिद्धि प्राप्त करून घेतल्या ! पंचाक्षरी बनून भूतांना शिक्षा केली ! साधकबाधक विद्या शिकलां ! परंतु तुमचे चित्तांत एक सरूप ज्ञानकला नसल्याने त्या सर्व कळा अवकळा झाल्या ! विश्वांतील श्रेष्ठ औषधी एकत्र जमविल्या तरी अमृततुषाराशिवाय जशा त्या प्रेतास सचेतन करण्यास उपयोगी पडत नाहीत, त्याप्रमाणें आत्मज्ञानाशिवाय सर्व विद्या निष्फळ होत ! अहो योगीश्रेष्ठा, तुह्मीं आजपर्यंत ब्रह्मांडी प्राण नेऊन काळाला जिंकले, परंतु श्रीहरीच्या भक्तिप्रेमाशिवाय वैकुंठपीठ तुमच्या हातीं कसें लागणार ? आजपर्यंत हृदयाशी अहंता धरल्यामुळे तुह्मी आत्मज्ञानाला पारखे झालां ! चांगदेवा, योग्याची खूण ही नव्हे ! ती निराळीच आहे! जेव्हा तुमच्या हातून तमोगुणाचा नाश होईल, तेव्हाच मी तुम्हांला यागी ह्मणेन ! चांगदेवा, अष्टांगयोगेनसिणिजे ॥ यसनेमनिरोधनकिजेरया ॥१॥ वाचागीतगाईजै ॥ वाचागीतगाईजे ॥ गातांवाताश्रवणींऐकिजेरया ॥ ध्रु० ॥ गीताछंदेअंगडोलिजे ॥ लीलाविनोदॆसंसारतरिजेरया ॥ २ ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुनामें ॥ जोडे हा उपावो किजेरया ॥ ३ ॥ चांगदेव-( ज्ञानेश्वरमहाराजांचे चरणावर मस्तक ठेवून ) मनसंकल्पशुद्ध°नव्हे ॥ येन्हवींसदोदितआहेचिदानंद ॥ १ ॥ मनातेबुडवुनीइंद्रियातेदंडुनी ॥ मी सोडुनीसोह धरि ॥ ध्रु० ॥ चांगावटेश्वरींसोहंजाला ॥ अवघाचि बुडाला ज्ञानडोहीं ॥ ३ ॥ { इतक्यांत शिष्य चांगदेवांस पूजासाहित्य आणून देतात. चांगदेव श्रीनिवृत्तिनाथ, श्रीज्ञानेश्वरमहाराज, सोपानदेव व मुक्ताबाई यांची पूजा करितात व त्यांचे गळ्यांत पुष्पमाळा घालून चार प्रदक्षिणा करितात व साष्टांग नमस्कार घालून हात जोडून पुढे उभे राहतात.) | अहो सरुसमर्था, ज्या आपल्या चरणांची ब्रह्मादिकही पूजा कारतात, त्या चरणांची मी आज भक्तियुक्त अंतःकरणानें पूजा, करून कृतार्थ झालों ! आपल्या कृपादृष्टीने माझे समूळ अज्ञान ।