पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/111

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. १०१ नष्ट होऊन मी सच्चिदानंदैस्वरूप रत झालों ! मातोश्री चित्कला मुक्ताबाई, हिने या अज्ञान लेंकराला आपल्या ओटींत घेतल्याने जन्ममरणाच्या फे-यांतून मी आज मुक्त झालों ! याबद्दल अहो दीनदयाळ सङ्गुरुनाथा, अहो मातोश्री, मी आपला कसा उतराई होऊ ? मी आपल्याला काय अर्पण करूं ? आणि कोणत्या शब्दांनी आपला धन्यवाद गाऊं! सकलकलाविद्यासहित मी आपल्या पंचप्राणांची सद्गुरुचरणांवरून ओवाळणी केली आहे ! आणि तुह्मां समर्थांचे चरणतीर्थ प्राशन करून तुमच्या चरणीं दृढ मिठी दिली आहे ! तरी सद्गुरूंनी या दीन दासावर अनुग्रह करून, मला पाठविलेल्या पासष्टीचा अर्थ पूर्णपणे माझ्या मनांत भरवून देऊन माझा उद्धार करावा. ज्ञानेश्वर- चांगदेवश्रेष्ठा, या पासष्टीचा अर्थ मुक्ताबाई तुम्हांला उघड करून सांगेल ! परंतु याला एक बळी द्यावा लागतो ! तरी तुमच्या चौदाशे शिष्यांपैकी एकास बळी या, आणि मग पासष्टीचा अर्थ समजून घ्या ! चांगदेव-श्रीची आज्ञा या दासाला प्रमाण आहे. ज्ञानेश्वर- योगीश्रेष्ठा, आमच्या मठांत आपल्याला ठेवून घेऊन, आपल्या सत्समागमाचे सुख कांहीं दिवस तरी उपभोगावे असे आमच्या मनांत आहे ! तरी आह्मांवर एवढा अनुग्रह आपण केलाच पाहिजे. चांगदेव- सद्गुरुनाथा, आपल्या चरणाविराहत या चांगदेवाला त्रिभुवनांत कोणतीच गोष्ट आतां प्रिय उरली नाहीं ! तेव्हां सङ्गुरूं नींच कृपाळू होऊन या दासाला सङ्गुरुपायांची निरंतर सेवा घडू द्यावी, हेच या शरणागाचे सद्गुरुचरणीं अनन्यभावाने मागणे आहे ! | ज्ञानेश्वर- चांगदेवा, चला तर ! ( सर्व जाऊ लागतात. भितही त्यांच्या मागे जाऊ लागते; तिला उद्देशून ) भिंतीबाई, तुम्हाला आमच्या मागून येण्याचे कारण नाही. तुह्मी आता येथे अशाच कल्पपर्यंत उभ्या राहा ! ( भिंत थांबते. सर्व एकामागून एक निघून जातात. मात्र चांगदेवांचे शिष्य मार्गे थांबतात.)