पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/113

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. १०३ असतात. त्यांपैकी दोन चार मोडले तर तिचें कांहीं अडत नाहीं ! त्याप्रमाणे आपल्या गुरुजींचे चौदाशें शिष्य आहेत, त्यांपैकी आपण तिघेच निघून गेलो तर स्वामींचे थोडेच अडणार आहे ? आपण पडलों कुटुंबाचे घरीं एकएकटे ! तेव्हा आपण मेलों तर आपल्या बायकांमुलांना दुसरे कोण आहे ! अरे, एक जन्म आपल्या प्रारब्धाने उचल खाऊन आपल्याला सर्व भोग अनुकूल करून दिले आहेत ! तर त्यांचा उपभोग घेण्याचे सोडून, गुरुभक्तीसाठी जीव घालावणे, यासारखा दुसरा मूर्खपणाच नाहीं ! दुसरा शिष्य- खरे आहे मित्रा! चला तर आपले चंबूगवाळे आटोपून आपण आतांच्या आतच आपापल्या घराचा मार्ग धरूं म्हणजे झाले ! चला, चला, चला तर. ( सर्व निघून जातात. ) प्रवेश पांचवा. स्थळ- अलंकापूर. ( श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा मठ. एका भितीआड मुक्ताबाई आंग धुवीत बसली आहे. इतक्यांत चांगदेव खिन्नमुद्रेनें प्रवेश करतात.) चांगदेव-( मुक्ताबाई आंग धुवीत बसली आहे तिकडे लक्ष न जाऊन आपल्याशीच ) माझ्या शिष्याँपाशीं काल रात्री मी बळीची गोष्ट काढतांच, रणांगणांत राजा पडल्यावर जसे सर्व सैनिक देहलोभाने चारी वाटा पळत सुटतात, त्याप्रमाणे माझे चौदाशें शिष्य बळीची गोष्ट ऐकताच मला सोडून एका क्षणांत निघून गेले ! तेव्हां हर ! हर ! आज चौदाशे वर्षे या देहाला व्यर्थ शिपावन मी स्वतःची नागवणूक करून घेतली ! असो. आतां यापढ़ें या संतांच्या गांवीं राहून, आणि अहोरात्र यांची सेवा करुन, या देहाला विसावा देईन ! मातोश्री मुक्ताबाईने काल मला उपदेश करतांना, निर्गुणाचेडाहाळींपाळणालाविला ॥ तेथेसुतपहुडलासुक्ताईचा ॥१॥ नीजनीजबाळानकरीपेंआळी ॥ अनुहात