पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/114

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. टाळीवाजवीते ॥ ध्रु० ॥ तेथेनिज्ञानाजागृतिभोगीप उन्मनी ॥ लक्षतो भेदुनीनिजातो ॥ २ ॥ निभ्रांतपाई पाळणाविणउनी ॥ मनहेबांधोनीपवनदोरा ॥३॥ एकविससहस्रनाहावेळेबाळा॥ तोहीडोळास्थिरकरी ॥४॥ निदानाजागृतिनिजसीकाई ॥ परियेसीचांगयाबोले । मुक्ताबाई ॥ ५ ॥ ( इतक्यांत चांगदेवांची दृष्टि मुक्ताबाईकडे जाते. तेव्हां से डोळ्यांवर हात ठेवून, तोंड मागे वळवून, आपल्याशीच ह्मणतात. ) शिव ! शिव ! मातोश्री मुक्ताबाई मंगलस्नान करीत असतां देवाने तिचे शरीर माझ्या दृष्टीस पाइन, आज मला महत्पापांत लोटलें ! आता मी कोणते प्रायाश्चत्त घेऊ ? आणि या पापाचे क्षालन कसे करूं ? । | मुक्ताबाई- ( वस्त्र गुंडाळून पुढे येऊन चांगदेवांस उद्देशून ) अरे चांग्या ! मेल्या निगुन्या चांग्या ! मला पाहून, डोळ्यांवर हात ठेवून, पाठ वळवून, माघारा फिरलास तो कां ? अरे, आत्मज्ञानबोध ॥ नाहींतुजझाला ॥ विकल्पउदेला ॥ तेणेचित्तीं ॥ १ ॥ आत्मारामजोका ॥ नांदेतवदेहीं ॥ तोचिज्ञानेपाही ॥ शरीरीया ॥ ध्रु० ॥ स्त्रीपुरुषनामें ॥ कापबाळ्याभिन्न ॥ दोहोंतीकांचन ॥ मूळएक ॥ २॥ घागरीरांजण ॥ जरिभिन्नाकृती ॥ मृत्तिकाआहेती ॥ सदए । ३।। स्त्रीपुरुषदेह ॥ दृष्टीसीनिराळे । चैतन्य वेगळे ॥ नाहींत्यांत ॥ ४ ॥ पाहीपांडुरंग ॥ सर्वत्रबिंबला । रितानाउला । ठावएक ॥ ५ ॥ आणखी चांग्या, जनीं वन हिंडे गाय ॥ पारि वस्त्र नेसे काय ॥ १ ॥ मी तशीच तुझी माय ।। अंतरीं येवो प्रत्यय ॥ २ ॥ कोनाडे जसे भिंतीला ॥ नऊ द्वारे या देहाला ॥ ३॥ जरि गुरुबोध होता । विकल्प ना मानं येता ॥ ४ ॥ चांगदेवा, हे जग आत्मवत् माना, ह्मणजे स्त्रीपुरुषांच्या मिथ्याभासाला तुमच्या हृदयांत तिळभरही जागा मिळणार नाहीं !