पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/115

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. १०५ चांगदेव- ( मुक्ताबाईचे पायांवर डोके ठेवून ) मातोश्री, तुमचे में अबाधित ज्ञान जाणून मी तुमचे चरण धरिले आहेत ! पण म्हणूनच मला समर्थ श्रीज्ञानेश्वर सद्गुरूंनीं तुमच्या हातीं निरविलें आहे ! तरी मातोश्री, माझ्या मस्तकावर आता अभयकर ठेवन मला शरणागताला आत्मज्ञानबोधामृत पाजून सज्ञान करावें ! मुक्ताबाई- ज्ञानदेवदादांनीं, तुम्हांला उपदेश करण्यापूर्वी, तुम्हांपासून बळी घेण्याबद्दल मला सांगितले आहे. तरी अहो चांगदेवा, बळी देण्याची तुमची तयारी आहेना ? चांगदेव-मातोश्री, काय सांगू ? मी सिद्धीचा बाजार मांडून चौदाशें सांप्रदायी मिळविले ! परंतु मी त्यांच्यापाशी बळीची गोष्ट काढतांच, ते मला सोडून केव्हांच चालते झाले ! तरी मातोश्री, तुह्मां सर्वांच्या प्रेमळ मूर्ति ज्योत मी अखंड सांठविल्या आहेत, अशा या माझ्या देहाचा बळी घेऊन माझ्या कानीं उपदेश सांगून माझा उद्धार करावा ! मुक्ताबाई- चांगदेवा, शाबास ! धन्य ! धन्य आहां तुम्ही ! मुमुक्षुदशा परिपक्व स्थितीप्रत पोहोंचली नाही तोपर्यंत निजवस्तु प्राप्त होणे कठीण ! तुमच्या मागची शिष्यशाखेची उपाधि नाहींशी होऊन, तुमच्या हृदयांतील शिष्यशाखेचा अभिमान नष्ट व्हावा, म्हणून माझ्या ज्ञानदेवदादांनीं तुम्हांपाशी बळी मागितला होता ! माझ्या ज्ञानदेवदादांनीं योजिलेल्या ह्या उपायामुळे शिष्यशाखेचा अभिमान आणि देहावरील ममत्व या दोन्हीही गोष्टी तुमच्या हृदयांतून आतां नष्ट झाल्या आहेत! चांगदेव- अहाहा ! सदुरुसमर्था ज्ञानराजा, केवढी ही आपली थोर भक्तवत्सलता ! मुक्ताबाई- चांगदेवा, तुह्मी अगोदरच शुद्धपात्र आहां ! आणि सद्गुरुवाक्याने तुमच्या अंतःकरणांत पूर्ण वैराग्य उत्पन्न झालें १ आहे ! तर आतां तुह्मांला अधिक काय सांगावयाचे आहे ? पण हेमीहेमीप्रचितपाही ।। अनुभवआलियाभेदचिनाहीं ॥१॥ सोहंकारमननसंडीसाच ॥ मीपणनाहींतेथेतूपणकैंचें ॥ २ ॥ अहंतेमीसोहंतेगुज । मुक्ताह्मणेचांगयाबुझ ।। ३॥