पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/117

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. १०७ प्रवेश सहावा. स्थळ-अलंकापूर. (श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा आश्रम. श्रीज्ञानेश्वरमहाराज प्रवेश करतात.) ज्ञानेश्वर- ( मनाश) क्षीरसिंधुमंथनाचे वेळीं भगवान् श्रीविष्णूनी मोहनीरूप धारण करून दानवांना मोहित केले, आणि देवांना अमृत पाजून संतुष्ट केले; आणि त्याच मोहनीरूपाने भगवंतांनी प्रवरातीरीं जेथे वास केला, आणि जेथे श्रीविष्णूच्या अर्धनारीनटेश्वरस्वरूपाचे दर्शन घेण्याकरितां सर्व देवता प्रत्यहीं येत आहेत, अशा निवासक्षेत्रीं मोहनी राजासन्निध राहून, श्रीमद्भगवद्गीतेवर भावार्थदीपिका नांवाची मीं महाटींत टीका लिाहली; आणि ती श्रीसद्गुरु निवृत्तिनाथांस दाखवली. तेव्हां सद्रुनाथ ती टीका पाहून परम संतोष पावून मला म्हणाले, ज्ञानदेवा, प्राचीन संस्कृत ग्रंथावर महाटींत टीका लिहिलेली पाहण्यापेक्षां, तू मल्हाटीत एकादा स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला पाहावा, अशी माझी फार इच्छा आहे ! कारण असा स्वतंत्र ग्रंथ ते लिहिलास, झणजे त्यांत तुझी बुद्धि, तुझे ज्ञान आणि तुझा अनुभव हीं आम्हांस पाहावयास सांपडतील! तेव्हां सद्गुरूंची आज्ञा शिरीं धारण करून, मीं सद्रूंना हो ह्मणून म्हटले, आणि ग्रंथास सुरवात केली. सद्गुरु-आज्ञेप्रमाणे असा ग्रंथ माझ्या हातून कसा लिहिला जाईल, याची मला मोठी भीति वाटत होती. परंतु श्रीसद्रूंच्या आशीर्वादाने आणि श्रीपांडुरंगाच्या कृपेने, मी हातीं घेतलेला माझा अमृतानुभव ग्रंथ शेवटास जाऊन, तो मी सङ्गुरुचरणी अर्पण केल्या दिवसापासून माझ्या मनास मोठे समाधान वाटत आहे ! आता एकदां श्रीसद्गुरूंनी या ग्रंथाचे अवलोकन करून त्याला मान डोलविली, म्हणजे माझ्या श्रमाचें साफल्य झाल्याबद्दल मला अत्यानंद वाटणार आहे ! आज सरु निवांत चित्ताने माझा ग्रंथ अवलोकन करीत बसले आहेत, तेव्हां तेथवर जाऊन सद्गुरुमुखांतून आशीर्वादप्रसाद मिळाल्यास पहावा!