पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/118

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. ( इतक्यांत श्रीनिवृत्तिनाथ अमृतानुभव ग्रंथ पुढे घेऊन तो अवलोकन करीत बसले आहेत व त्यांच्याजवळ सोपानदेव व मुक्ताबाई हीं उभी आहेत, असा पडदा उघडतो. श्रीज्ञानेश्वरमहाराज, श्रीनिवृत्तिनाथांस साष्टांग नमस्कार घालून, हात जोडून त्यांच्यापुढे उभे राहतात ) निवृत्तिनाथ- वाळा ज्ञानराया, वेदांच्या उपनिषदांचे या ग्रंथांत काढलेले तू सार आणि तुझ्या स्वानुभवाप्रमाणे चित्स्वरूपाचे यांत तू केलेले दिग्दर्शन पाहून, मला अत्यानंद वाटत आहे ! बाळा, तू या ग्रंथांत सांठविलेलें हें स्वानुभवामृत जे कोणी आवडीने प्राशन करतील, ते साक्षात् परमेश्वरस्वरूप होऊन जीवन्मुक्त होतील, हा माझा पूर्ण आशीर्वाद आहे ! । ज्ञानेश्वर- श्रीसद्गुरुसमर्था, आपल्या ह्या आशीर्वादाने मी कृतकृत्य झालों ! निवृत्तिनाथ- बाळा ज्ञानराया, काल रात्री तुला कांहीं विलक्षण स्वप्न पडल्याचे मुक्ताबाई सांगत आहे. तो स्वप्नचमत्कार तुझ्या तोंडून ऐकण्याची इच्छा आहे. तर सांग बरे असे कोणते स्वन तू पाहिलेंस ते ? ज्ञानेश्वर- सद्गुरुसमर्था, कांहीं सकल सौभाग्यमंडित स्त्रिया माझ्यापुढे येऊन उभ्या राहिल्या आहेत, असे मी स्वप्न पाहिलें ! मातोश्रींनो, तुझी कोण आहा ! असे मी त्यांना विचारतांच, त्या एकामागून एक मी कृष्णा आहे, मी भीमा आहे, मी यमुना आहे, असें ह्मणू लागल्या ! ते ऐकून जगतास पावन करणारी तीर्थंच स्त्रियांची रूपे घेऊन मला दर्शन देण्याकारतां आली आहेत, असे माझ्या मनांत आलें! ही कल्पना खरी काय झणून मी त्यांना विचारताच, त्यांनी हो ह्मणून झटलें ! तेव्हां मला आनंद होऊन मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला, आणि हात जोडून पुढे उभा राहून, आपली आज्ञा काय आहे, ह्मणून मी त्यांना विचारणार, तोंच त्या सर्व स्त्रिया एकदम अदृश्य झाल्या ! आणि मीही इकडे आश्चर्य करीत स्वप्नांतून जागा झालों ! तेव्हांपासून या विलक्षण स्वप्नाचा अर्थ काय असावा, याचा विचार मी हा वेळपर्यंत करीत आहे !