पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/119

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. १०९ निवृत्तिनाथ- ज्ञानराजा, ह्या स्वप्नावरून मला असे वाटते कीं, या भूतलावरील सर्व तीर्थं तुला दर्शनास बोलावीत आहेत ? ज्ञानराजा, मागे मी गैनीनाथांच्या आश्रमात विद्याभ्यास । करीत असतां, श्रीदत्तमहाराज, आदिगुरु मत्स्येंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ, यांचे पुण्यप्रददर्शन मला वडले, हे मी तुला सांगितलेंच आहे. तेव्हां सद्गुरूंचे दर्शन या दासाला पुन्हा केव्हां घडेल, असे मी विचारले असता, सद्गुरूंनी मला असे सांगितले की, निवृत्ति, तुझा वधु ज्ञानदेव, याच्याबरोबर जेव्हां तू तीर्थयात्रेस निवशील, तेव्हां मणिकर्णिकेच्या घाटावर तुला आमचे पुन्हा दर्शन होईल! तेव्हां तुझ्या या स्वप्नाशी, सद्गुरूच्या वचनाचा मेळ बरोबर जुळतो ! तरी तीर्थीनीं व सद्गुरुनाथांनी उभयतांनीही अनुज्ञा केल्याप्रमाणे आपण उदयीक सर्वच तीर्थयात्रेस निघं ! ज्ञानेश्वर - श्रीसद्गुरुनाथांची आज्ञा शिरसा वद्य आहे ! पण प्रथम पंढरीस जाऊन तेथे श्रीपांडुरंगाचे चरण पाहून, मग क्रमाक्रमाने एकेका तीर्थाचे दर्शन घेण्याबद्दल सद्गुरुनाथांचा अनुज्ञा असावी ! निवृत्तिनाथ- ज्ञानदेवा, तुझी तशी इच्छा आहे तर श्रीपांडुरंगाचे दर्शन घेऊन मग तीर्थयात्रेस निघू ! मुक्ताबाई- सद्गुरुनाथा, या यात्रेत भगवद्गुणानुवाद गाणा-या एकाद्या श्रेष्ठ संताची संगति जर आपल्याला लाभेल, तर वाटेने आपला कालक्षेप उत्तम होईल, असे मला वाटते ! |सोपानदेव- सद्गुरुनाथा, मुक्ताबाईचा हा विचार मला बरा दिसतो ! ज्ञानेश्वर- सद्गुरुनाथांची आज्ञा होईल तर पंढरीत गेल्यावर मी माझ्या लाडक्या नामदेवाला आपल्याबरोबर पाठविण्याविषयी पंढरीनाथाला गळ घालीन ! जसा पूर्वयुगीं प्रल्हाद तसा या युगीं माझा नामदेव भक्तश्रेष्ठ असून, त्याने आपल्या थार भक्तीने श्रीपांडुरंगाला ऋणी केला आहे ! निवृत्तिनाथ - ज्ञानराजा, नामदेवासारख्या प्रेमळ वैष्णवाच्या संगतीचा लाभ जर आपल्याला मिळेल तर याहून अधिक तें। श्रीपांडुरंगापाशीं आपल्याला काय मागावयाचे आहे ! | ११