पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/120

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० श्रीज्ञानेश्वरमहाराज. ( इतक्यांत अलंकापुरीतील विसोबा खेचरादि बह्मवृंद व अठरापगड जातींचे नागरिक प्रवेश करतात; व श्रीनिवृत्तिनाथ, श्रीज्ञानेश्वरमहाराज, सोपानदेव व मुक्ताबाई यांस साष्टांग नमस्कार घालून, हात जोडून त्यांच्या पुढे उभे राहतात. ) विसोबा खेचर- अहो महाशांता शंभुस्वरूपा श्रीनिवृत्तिनाथा, अहो श्रीविष्णुस्वरूपा ज्ञानदेवा, अहो विधिस्वरूपा सोपानदेवा, पृथ्वीवरील अखिल क्षेत्रस्थांचे अनमत घेऊन, त्यांच्या अनुज्ञेने आह्मी अलंकापुरवासी ब्रह्मवृंद अाणि इतर नागरिक जन, तुह्मां श्रेष्ठांच्या चरणीं अत्यंत लीन होऊन, जीवधनाविषयी विज्ञप्ति करण्याकरितां सद्गुरुचरणीं धांव वेतली आहे ! मौंजीबंधनासाठी विपुल द्रव्य आणि सकल सामुग्री ही देशोदेशींहून जमा केली आहे ! तरी श्रीसद्गुरूंनी आमच्या विनंतीस मान देऊन, आह्मांस धन्य करावें ! आणि वेदशाखोचित व्रतबंधसंस्कार झाल्यावर समर्थांनी येथेच अखंड - वास करून आमचा उद्धार करावा ! ज्ञानेश्वर- अहो श्रेष्ठहो ! आह्मां जातिहीनांना संस्कारवैभव कशाला पाहिजे ? कर्मभूमीत येऊन देहबुद्धि निपटून गेली नाही, तर संस्कारादि अन्य साधने नकळत व्यर्थ गेल्याप्रमाणे त हा नरदेह मूळचाच ब्रह्म असून त्याची संस्काराने रांगोळी कां करावी ? रत्नखचित स्थाली सुवर्णमय चुलीवर ठेविल्यावर आणि त्याखाली चंदनकाष्ठअग्नि प्रदीप्त केल्यावर, मग त्या रत्नखचित स्थालांत पेंड करण्याचा आग्रह का धरावा ? देहअहंकार नष्ट झाला नाही, तोपर्यंत संन्यास घेऊन मुंडन केल्याने नारायण कसा होणार ? सर्व देहांत उत्तमोत्तम असा हा नरदेह मूळचाच ब्रह्मानंदमूर्ति आहे ! याकरिता आह्मांला दीक्षा संस्कार साधन संपत्ति कांहीं एक नको आहे ! खेरीज आझांसारख्यांचा व्रतबंध शास्वनिषिद्ध आहे ! विसोबा खेचर- अहो विठ्ठलभक्तिप्रवर्तका ज्ञानराया, आह्मां अलंकापूरवासी मूढजनांनी पूर्वी आपला अत्यंत द्वेष आणि छल केला ! परंतु आपण सगुफसमर्थांनी आमचे सर्व अपराध पोटांत