पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/121

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. १११ घालून, आपल्या पुनर्दर्शनाने जसे आह्मांस धन्य केले, तसेच या वेळीही आमची ही विनंती सद्गुरूंनी मान्य करून आह्मांला धन्य करावें ! आह्मांस वृद्ध मान्य आपणच आहां ! तेव्हा तुम्ही समर्थांनी आह्मां बालकांचा एवढा हट्ट पुरविलाच पाहिजे ! भर दोनप्रहरी पराशर ऋषि गंगेमध्ये कैवर्तकाच्या कन्येशी रत झाले आणि त्या कन्येच्या उदरीं श्रीव्यास जन्मास आले! निमीच्या शापाने देववेश्येच्या उदरांत वसिष्ठमुनींनी जन्म घेतला ! असे दाखले आम्ही कोठवर द्यावे ! तेजस्वी पुरुषांना तिळभरही दोष नाहीं ! तुम्ही विश्वगुरु पूर्ण तेजस्वी आहां ! तेव्हा आपल्याला निषिद्ध असे कांहींच नाहीं. । | ज्ञानेश्वर- श्रेष्ठहो, श्रीव्यासवसिष्ठादिकांप्रमाणे आमच्या आंगांत सामर्थ्य नाहीं ! आणि तसे सामर्थ्य श्रीपंढरीनाथाच्या कृपेने जरी आमच्या आंगीं आलें, तरी स्वसामर्थ्यबलावर जर आम्हीं वर्णाश्रमधर्माचे सेवन केले, तर वर्णसंकर होईल! आणि अशा वर्णसंकरास जर आम्हींच कारणीभूत झालो, तर मग कोण कोणाचे निवारण करील ? कोण कोणाला विचारील ? आणि मग वेदविधि कोठे उरतील ? या कलीमध्ये आमचा दाखला देऊन, विषयांव पुरुष आह्मांसारखेच आचरण करतील ! तुह्मी द्विजश्रेष्ठ वेदशास्त्रांचे संरक्षक आहां ! धर्माचे प्रतिपादक आहां! तेव्हां तुह्मां शुद्ध ब्रह्मवृंदांना आम्ही साष्टांग नमस्कार घालून, हेच मागणे मागतों कीं, ह्या व्रतबंधाच्या आग्रहीं तुम्ही पडू नये. षड्गुणैश्वर्ययुक्त दयानिधि श्रीपांडुरंग आमचे आराध्य दैवत आहे ! आणि श्रीपंढरीनाथाची शक्ति सर्वाधिष्ठात्री रुक्मिणीदेवी आमची माताश्री आहे ! निर्गुण जें ब्रह्म ते आमचें स्थितीचे स्थान आहे ! आदिनाथापासून आमची संप्रदायपरंपरा आहे ! अवधूत चिन्ह निर्भय मुद्रा आह्मीं धारण केल्या आहेत ! आणि श्रीविठ्ठलाचे पवित्र नांव हेच आमचे नित्याचे सेवन आहे ! तरी तुह्मी श्रेष्ठांनी आह्मांला क्षमा करावी. या भूमंडळावरील सकलतीर्थांनी आम्हांला दृष्टांत देऊन तीर्थाटन करण्याविषयीं अनुज्ञा