पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/122

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था, प्रवेश पहिला. سی سی حد स्थळ-कहाड नगरी. ( राजवाड्यांत, राजा रामराजा याची स्त्री, राणी सीताबाई, श्रीमद्भागवत ग्रंथ पुढे घेऊन बसली आहे व तिच्या शेजारी तिची सखी कमळा बसली आहे व पलीकडे दासी पिंगला उभी आहे असा पडदा उघडतो. ) सीताबाई- ( श्रीमद्भागवत ग्रंथाची पाने चाळतां चाळता ) सखे कमळे, काल कुठपावतर वाचलं होतं ते आहे ना तुझ्या ध्यानांत ? सांग बरं कुठपावतर वाचलं होतं ते ? कमळा- काल ना ? हो; आहे माझ्या ध्यानांत. उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुवबाळ, भगवंतांच्या स्वरूप एकाग्र मन करून समाधि लावून बसला होता. त्यामळे सर्व विश्वाचे प्राण एकदम कोंडले ! तेव्हां सारे देव शेषशाई भगवंताला शरण गेले; नी प्रार्थना करू लागले की, हे देवाधिदेवा, शेषशाई नारायणा, आमचं रक्षण कर ! ही प्रार्थना ऐकून भगवंतांनी देवांना अभय दिलं, नी ते गरुडावर बसून मधुवनांत ध्रुवबाळापुढे येऊन " राहिले ! पण ध्रुवबाळ डोळे उघडून भगवंतांच्याकडे पाहीना ! तेव्हां भगवंतांनीं भुवबाळाच्या हृदयांतन आपलं स्वरूप गुप्त केल ! हृदयांतले भगवंतांचे स्वरूप गप्त होतच ववाल नेत्र उबटन पाहू लागला ! तो हृदयांत असलेलं भगवंतांचे स्वरूप आपल्यापुढे उभं आहे असं त्यानं पाहिलं ! तेव्हां तो गोंधळून गेला ! पुढे उभे राहिलेल्या भगवंतांची स्तुति करावी असं त्याच्या मनांत अलं; पण त्याला कांहीं सुचेना ! ध्रुवबाळाची उडालेली ही थांदल भगवंतांनी ओळवून, त्यांनी आपल्या हातांतील शंख ध्रुवबाळाच्या गालाला लावला ! तेव्हां धुबाला बाणी फुटून तो