पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/124

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. ये त्वब्जनाभभवदीयपदारविंद सौगंध्यलुब्धहृदयेषु कृतप्रसंगाः ॥ ३ ।। । हे देवा कमलनाथा ईश्वरा ! ज्या भगवद्भक्तांचे मनोभ्रंग तुझ्या चरणकमलसुगंधाला लोलुप झाले आहेत, अशा संतांचा मला नेहमी समागम दे.कारण, देवा,अशा संतांची संगत लाभली असतां, देहाचं नी पुत्रादिकाचं भान नष्ट होऊन भगवत्पदचित्त तल्लीन होऊन जातं! बाई कमळे, ऐकलंसना ! धुववाळ लहान होऊन त्यानं देखील साधुसंतांचा सहवास मला नित्य वडावा, हेच मागणं देवापाशी मागितलं ! नी आमच्या या कन्हाई नगरीत तर, साधुसंत दृष्टीस पडला कीं, भर दोनप्रहरी त्याची धिंड काढून त्याला सुळावर देणं चाललं आहे ! हें ठीक नाहीं ! साधुसंतांची हत्या करणं हें वोर पाप आहे! ही मृत्युलोकची वस्ती क्षणिक ! देवाच्या घरचं बालावणं कधी येईल याचा नेम नाहीं ! ह्मणून आयुष्य आहे तंवर पुण्याचरणानं वागत असावं ! मेल्यावर पापाचे झाडे यमाच्या वरीं द्यावे लागतील! एक की दोन, कितीतरी प्रकारांनी मी महाराजांना रोज हात जोडून प्रार्थना करून विनवीत आहे ! पण वाई, कुटिल मंत्र्यांनी नित्य महाराजांच्या कानांशीं साधुसंतांची निंदा करून करून, महाराजांचे कान पूर्ण भरविले. आहेत ! त्यामुळ अलीकडे तर महाराज माझं बोलणं ऐकून देखील घेईनासे झाले आहेत ! बाई कमळे, या हरिभक्तांच्या हत्येमुळे नगरांत अकाली मृत्यु होऊ लागले आहेत ! कुत्री दिवसा रात्रीं रडू लागली आहेत ! अश्वशाळेतील अश्व नी गोशाळेतील गाई नेत्रांतून अश्रू ढाळीत आहेत ! वासरं स्तनपान करीत नाहीशी झाला आहेत ! एक ना दोन, अशी हजारों अशुभ चिन्हं अलीकडे सर्वत्र दिस्नं लागली आहेत ! नी या सर्व अरिष्टांचं फळ अह्माला लवकरच मिळेल अशी मला आतांशी मोठी धास्ती वाटू लागली आहे ! ( इतक्यात राजवाड्याचार गलबला होतो तो ऐकून ) कमळे, यावेळी राजवाड्याबाहेर ही कसली ग ओरड ऐकू येत आहे । असं कांहीं ऐकलं ह्मणजे मला धडकीच भरते ! पिंगले, बाहेर जाऊन बघ बाई हे काय आहे ते ! (पिंगला निघून जाते.) कमळे,