पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/125

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. । ११७ साधुसंतांचं दर्शन घेऊन त्यांचे चरणतीर्थ घेतल्याखेरीज तोंडांत अन्न घालायचं नाही, हा माझ्या बाबांचा नेम मी माझ्या आठवणींत आज पंचवीस वर्स पाहते आहे ! नी त्यामुळे मी जंवर चाकणेस होतें तंवर मला नित्य साधुसंतांचे दर्शन घडत असे! लग्न झाल्यावर चाकणेहून मी या कहानगरीत आल्यावर देखील पहिली दहा वर्स, जंवर महाराजांची साधुसंतांवर निष्ठा होती, तंवर कधीं सठींसामास तरी साधुसंतांचे दर्शन मला होत होतं ! पण या उभ्या दोन वर्दीत, साधुसंतांना पाहून महाराजांच्या तळव्याची आग 'मस्तकाला जाऊ लागल्यापासून, कमळे, मला एक दिवस देखील कुणा सत्पुरुषाचं दर्शन झालं नाहीं ! ( इतक्यांत पिंगला परत येते, तिला उद्देशून ) पिंगले, काय ग बाई, कसली ग ओरड आहे ? पिंगला- बाईसाहेब, नगरांतील ब्राह्मण नी दुसरे नागरिक राजवाड्यापुढे जमून, आह्मांला राणीसाहेबांची भेट करवा, आह्मांला राणीसाहेबांची भेट करवा, असं मोठ्याने ओरडत आहेत ! सीताबाई- पिगले जा, नी त्या ब्राह्मणांना दंडवत घालून, इथवर येऊन माझ्या हातून पूजा ग्रहण करावी अशी माझी प्रार्थना आहे, असं त्यांना सांग; नी त्यांना इथवर घेऊन ये. नी इतर नागरिकांना ह्मणावं, तुह्मी स्वस्थ चित्तानं आपापल्या घरी जा. ब्रह्मवृंदांच्या मुखांतून जशी आज्ञा निवेल तसं वागायला आह्मी तयार आहों ! ( पिंगला निघून जाते. ) कमळा- बाईसाहेब, ब-याच दिवसांनी आजच महाराज नगर सोडून शिकारीला गेले! त्यांना गेल्याला अजून प्रहर देखील झाला नाहीं ! तो इतक्यांतच आपल्या नगरावर असं कोणतं संकट ओढवलं असेल बरं, की सर्व नागरिकांनी आपल्या चरणाजवळ इतक्या तातडीनं धाव घेतली ? सीताबाई- कमळे, काय असेल ते असो ! मला तर किनई आतांशी नित्य वेडीवाकडी स्वप्नं पडू लागली आहेत ! मग आमच्यावर अखेर असं कोणतं भयंकर संकट ओढवणार आहे ते देवाला ठाऊक ! ( इतक्यांत पिंगला ब्राह्मणांस घेऊन येते, वे