पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/126

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. ११९ अनुज्ञा मागण्याकरितां आह्मी यावेळी येथे आलो आहों ! तर आह्मांला सुखाने निरोप दे ! सीताबाई- श्रेष्ठहो ! महाराजांना नित्य प्रार्थना करून या पापमातून त्यांचे मन वळविण्याचा मी प्रयत्न करीत आहे ! नी आज नाहीं उद्या, उद्यां नाहीं परवां, केव्हां तरी परमेश्वर त्यांच्या अंतःकरणांत सद्बुद्धि जागृत करील, अशा आशेवर मी दिवस कंठात आहे! ह्मणून माझं तुह्मां श्रेष्ठांपाशी नी सर्व नगरवासी जनांपाशी पदर पसरून हेच मागणं आहे की, तुह्मी धीर न सोडतां कांहीं दिवस तरी या नगरांत राहून आमच्या हातून चरणसेवा करून घ्यावी ! तुह्मी आमचे मायबाप ! तुमच्या कृपेच्या सावलीत आह्मी नांदत आहों ! अहो महाभागा, तुमच्या पुण्याचरणाचा अग्नि या नगरांत रात्रंदिवस पेटला असून, त्यांत महाराजांच्या हातून नित्य घडणा-या उदंड पापराशी जळून खाक होत आहेत ! नी त्यामुळेच महाराजांचं यश, वल नी कीर्ति हीं इतके दिवस स्थिर राहिली आहेत ! पण तुह्मी जर आह्मांला सोडून गेला, तर मग आमचा प्रतिपाळ कोण करील ? अहो श्रेष्ठहो, आह्मी अनंत अपराधी आहों ! पण आमचे अपराध पोटांत वाळून, तुह्मीं मनांत आणिलेला हा विचार माझ्यासाठी ह्मणून तरी कांहीं वेळ लांबणीवर टाका, हेच माझं तुमच्यापाशी पुन्हां पुन्हा पदर पसरून मागणं आहे ! | दुसरा ब्राह्मण- देवी, तुला काय सांगावे ? हे सांगतांना माझा कंठ भरून येत आहे ! आज प्रातःकाळीं राजसेवकांनी अत्यंत तेजःपुंज अशा चार साधूंना, ते नगरांतून हिंडत असतां, धरून महाराजांच्या पुढे नेले. तेव्हा महाराजांनीं, यांची नगरांतून धिंड काढून, यांना एका घटकेच्या आंत सुळावर चढवा, अशी आज्ञा केली ! तेव्हां दृतांनी तत्क्षणीच त्या साधूच्या मुसक्या बांधून, त्यांच्या खांद्यावर मूळ दिले, आणि नगरांतून त्यांची धिंड काढीत ते त्यांना वधस्थानाकडे घेऊन गेले! आपल्या आईप्रमाणे राजदूतांच्या हातून काम झटपट होते किंवा नाही, हे पाहण्याकरितां, महाराज शिकारीकरितां नगराबाहेर पडण्यापूर्वी सर्व