पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/127

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. त्यांस बसावयास आसन आणून घालते. सीताबाई उठून ब्राह्मणांस नमस्कार करते. त तिला 'अखंड सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद देतात. ) महाराज, या आसनावर बसून शांत व्हा, नी माझ्या हातून पूजा ग्रहण करून मग प्रसन्नचित्तानं जी आपला अनुज्ञा असेल ती आह्मां सेवकांना कथन करा ! ( सर्व ब्राह्मण आसनस्थ होतात; इतक्यांत पिंगला पूजासाहित्य आणून देते. सीताबाई त्यांची पूजा करून त्यांचे पादतीर्थ घेते. ) | पहिला ब्राह्मण- शुभं भवतु ! है देवी ! राज्यांत व्याघ्ररूप प्रधान आणि ग्रामसिंह सेवक जमल्यावर, आह्मी प्रजा सुखाने कशी नांदणार ? जे जा आपल्या राज्यांतील लोकांची मने संतुष्ट ठेवितो, त्यांना आपले पंचप्राण समजून त्यांचा प्रतिपाळ करतो, त्यालाच राजेश्वर ह्मणावें ! सत्कीर्तिरूप धर्मपत्नीचा त्याग करून, ज्या राजाने अनीतिदासीचा पदर धरला, त्या राजाच्या हातून प्रजापालन कसे होणार ? महाराजांचे चित्त अलीकडे अधर्मपंकाने मलिन झाले आहे ! सुहृद्, प्रजा आणि भूसुर यांच्या अकल्याणाचे चिंतन महाराज अलीकडे करू लागले आहेत ! जे आमचे महाराज पूर्वी शरत्कालीच्या चंद्राप्रमाणे निर्मळ आणि आकाशांतील धुवासारखे अचल होते ! जे पूर्वी पुण्यशाल आणि सत्यवचनी होते ! जे पूर्वी हातीं दानशस्त्र धरून सकल प्रजाजनांचे दारिद्य छेदून टाकत होते ! ज्यांच्या नियमाचा ओझी वाहतांना याचक कंटाळत होते ! ज्यांच्या दर्शनाने आह्मां प्रजेचा आनंद गगनीं मावत नव्हता ! ज्यांची मधुर वाणी एकून आमचे कर्ण सदा तृप्त होत होते ! अशा आमच्या परमपूज्य ५५ श्लोक महाराजांनी अलीकडे दुष्टसंग्रहाचे आणि साधुनप्रहा। व्रत स्वीकारून नित्यशः साधुसंतांचा छल करून त्यांना सु। देण्याचा जो क्रम चालविला आहे, तो या आमच्या नेत्राना आझांला यापुढे पहावेनासा झाला आहे ! राज्यांत अनेक अशुभ चिन्हे होऊ लागल्याचे, देवी, तुझ्या कानावर आलें असेलच. तेव्हा आह्मी सर्व नागरिकांनीं हैं राज्य सोडून दूरच्या रामराज्यांत जाण्याचा विचार केला आहे ! आणि हे देवी, या गोष्टीस तुझी देण्याचा नि नित्यशःकडे दुष्टसंग्रह