पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/128

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० श्रीज्ञानेश्वरमहाराज. शिकारी लोकांस आणि इतर परिचारकांस पुढे पाठवून देऊन, आपण स्वतः एकटेच मुद्दाम वधस्थानाकडे गेले! तो तेथे आपल्या आज्ञेप्रमाणे राजदूतांनी सर्व तयारी केली असून, चांडाळही सूळ रोवून, साधूंना सुळांकडे फरफर ओढून नेत आहेत असें महाराजांनी पाहिलें ! साधूंचा हा चाललेला छल नेत्रांनी पाहून महाराजांचे मुख पुत्रजन्माचा आनंद झाल्याप्रमाणे सुप्रसन्न झालें! आणि त्या प्रसन्नमुद्रेने महाराजांनी, हं ! चढवा सुळांवर ! अशी चांडाळांना आज्ञा केली, आणि त्या साधंच्या अंतकाळच्या यातना डोळे भरून पहात महाराज तेथे कौतुकानें उभे राहिले! त्यावेळीं सकल नगरवासी नेत्रांतून टपटप अश्र ढाळीत अधोवदन उभे राहिले! इतक्यांत त्या साधूंनीं परम क्रोधाने सर्व नागरिकांसमक्ष महाराजांना त्यांच्या तोंडावर असे झटले की, हे दुष्ट राजा, आह्मां निरपराध्यांचा तू निरर्थक प्राणघात करीत आहेस ! तरी आठ प्रहरांच्या आंत तू पुत्रशोकाने विव्हळ होशील, हा आमचा तुला वोर शाप आहे ! तिसरा ब्राह्मण- देवी, हा वोर शाप ऐकूनही महाराजांच्या अंतःकरणांत यत्किंचित् भीति अथवा वेद उत्पन्न न होता, किंवा त्या साधूना शरण जाऊन त्यांचे पाय धरण्याची सद्बुद्धि त्यांच्या हृदयांत जागृत न होता, उलट ते अधिकच कोपास चढले! आणि क्रोधाने लाल होऊन त्यांनी त्या साधंस लत्तापहार केला ! आणि असे काक मी आजपर्यंत पुष्कळ पाहिले आहेत ! असे ह्मणून त्यांनी चांडाळांस रखूण केली! त्याबरोबर चाडाळांनी तत्क्षणीच त्या साधंस मोक्षधामीं पाठविलें ! देवी, महाराजांनी त्यावेळी आह्मां नागरिकांना त्या साधूंची करुणा भाकण्यासही वेळ दिला नाहीं ! ( हा वृत्तांत ऐकत असतो सताबाईचं देहभान नष्ट होत जात जातां शेवटी ती बेशुद्ध होऊन पडते. ) कमळा-( सीताबाईच्या डोळ्यांत पाणी लावून ) अहो श्रेष्ठहो! हा प्राणघातक वृत्तांत बाईसाहेबांना सांगून, कायहो हा भयंकर प्रसंग तुह्मीं आणला ! बाईसाहेब ! बाईसाहेब ! अहो बाईसाहेब !