पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/129

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था.. १२१ ( इतक्यांत राजपुत्र बाळकृष्णा आई ! आई ! अशा हाका मारांत प्रवेश करतो; व सीताबाई जवळ येऊन पाहतो तो ती बेशुद्ध पडली आहे असे त्यास दिसते. ) बाळकृष्णा- कमळे, माझ्या आईला कुणी काय केलं ग ! तिला काय ग झालं ! ती असं का करू लागली ? आई ! आई! आई ग ! ए आई ! कमळा- बाईसाहेब, युवराज हाका मारीत आहेत ! त्यांचेकडे डोळे उघडून पहा ! तुमची ही अवस्था पाहून ते फार भेदरून गेले आहेत ! तर उठून त्यांना जवळ घ्या कीं हों ! (चाळकृष्णास जवळ घेऊन त्याचे तोंडावरून हात फिरवून ) महाराज ! तुह्मी भिऊ नका बरं ! आईसाहेबांना सहज आमच्याशी बोलतां बोलतां एकदम चक्कर आली आहे ! त्यांच्या डोळ्यांना मी आतां पाणी लावलं आहे ! त्या आतां सावध होतील वरं ! बाळकृष्णा- आई ! ए आई ! आईग ! माझ्याशी बोल की ग! माझ्यावर रागावली आहेस, ह्मणून का ग मला ओ देत नाहींस ? आई ! ए आई ! माझ्यावर अशी रागावू नको ग ! । - साताबाई-( मुलाचा शब्द ऐकून खडबडून उठून व त्याला हृदयाशी घट्ट धरून आणि त्याचे चुंबन घेऊन ) माझ्या राजहंसा, भिऊं नको! मला किनई भोंवळ आली होती! बाळा, मला सोडून इतका वेळ कुठे रे गेला होतास ? मी तुझी पाखरासारखी केवढा वेळची वाट पाहात आहे ! बाळ, महाराज आले कारे शिकारीहून परत ! बाळकृष्णा- आईग ! मी महाराजांच्याबरोबर शिकारीला गेलो, ह्मणून महाराज माझ्यावर रागावले ग ! आणि माझ्या आंगावर ओरडून, चल चालता हो वरीं ! असे ह्मणून त्यांनी मला चार कोसांवरूनच परत पाठविलें ! आणि मी आतां नगरांत येणार नाही, असे मला रागारागाने ह्मणाले ! आई, महाराज आतांशी मला असं हिडीसपिडीस कां ग करू लागले आहेत ? मजवरचा लोभ त्यांनी कां ग कमी केला ? आई, पण महाराजांप्रमाणे तू नको हो माझ्यावरची माया पातळ करुं ! ( सीताबाईला चिकटून ) आई, तू नाहीं ना मला दूर लोटणार ! ११