पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/13

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. अंक १ ला, प्रवेश पहिला. स्थळ-- प्रतिष्ठान ( पैठण ) क्षेत्र. ( प्रतिष्ठान क्षेत्रांतील श्रीगोदावरीचा घाट. घाटावर लहानसे देऊळ आहे. घाटाच्या पाय-यांवर जान्हवी धुणी धूत आहे व वल्लरी गोदावरीतून पाण्याची घागर भरून घेत आहे असा पडदा उघडतो. ) वल्लरी- ( गे दावरीतून पाण्याची घागर भरून घेऊन ती कमरे. वर ठेविते व झपझप पावले टाकीत घराकडे जाऊ लागते. ) जान्हवी- ( लुगडे चुबकीत असतां मध्येच थांबून वल्लरांकडे पाहून ) वल्लरी, अग वल्लरी ! ( वल्लरी थांबून मागे वळून पाहते ) अग, घागर भरून घेऊन अगदीं मुकाट्यानं जी तू तुरतुर पुढे निघालीस, ते मला इथे घर का बांधून राहायचं आहे ? अग, चार पिळे पिळीपर्यंत देखील का तुला धीर धरवेना ? तुझ्याकारतां मी आजपावतर कैकवेळा धुण्याची मोट डोक्यावर घेऊन नी पाण्याची घागर कमरेवर ठेवून प्रहानप्रहर उभी राहिली आहे, ते विसरलीस वाटतं ? ह्मणतात ना - गरज सरो नी वैद्य मरो ! तशांतली गत ! बरं पण वल्लरी, आजच्यानंच कांहीं सरलं नाहीं हो. येईल पुन्हा कधी तरी वेळ, तेव्हां पाहीन मग ! ( इतक्यांत उत्तरा धुण्याची पाटी कमरेवर घेऊन येते. तिला उद्देशून ) उत्तरे, पाहिलंत का, आज किनई वल्लरीबाईंना आपल्याशीं एक शब्द देखील बोलायला वेळ नाहीसा झाला आहे हो ! वल्लरी-जान्हवी, हे काय मेलं तुझं भलतंच बोलणं ? रिकामपण असल्यावर कुणी उभं का राहणार नाही ?