पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/130

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ श्रीज्ञानेश्वरमहाराज, सीताबाई- बाळा, तू माझे पंचप्राण ! तेव्हां तुला दूर लोटून मी कशीरे जिवंत राहीन ? बाळा, यापुढे तू बरीक मला सोडून क्षणभर देखील दूर जात जाऊ नको बरं! बाळ, या श्रेष्ठांना नमस्कार कर, नी यांचं चरणतीर्थ घे ! म्हणजे माझ्या राजसा, यांच्या आशीर्वादाने महाराज तुजवर पूर्वीप्रमाणं प्रेम करूं लागतोल बरं ! ( ब्राह्मणांस उद्देशून ) श्रेष्ठहो ! मी आपलं हे बाळ तुमच्या ओटींत घातलं आहे ! तर हे आपलंच आहे असं समजून याला आपला आशीर्वादप्रसाद या! ( बाळकृष्णा ब्राह्मणांची पूजा करून त्यांचे चरणतीर्थ घेतो. ) पहिला ब्राह्मण- दीर्घायुष्मान् भव ! युवराजा, तो जगच्चालक प्रभु तुला उदंड आयुष्य देवो ! आणि तुझ्या हातून सकल राजकुलाचा उद्धार होवो ! देवी, तूं चतुर आहेस ! तू विवेकी आहेस ! तेव्हां तुला आम्ही काय सांगणार ? अनन्यभावानें तू परमेश्वराला शरण जा; त्याचा धांवा कर; ह्मणजे तो भक्तवत्सल प्रभु तुझ्याकडे कधीही पाठ करणार नाहीं ! सीताबाई- महाराज, आपणही या आपल्या धर्माच्या कन्येकरितां देवाला संकट घाला! ह्मणजे तुमच्या भिडेस्तव देव आमचा सांभाळ करील ! ( इतक्यांत एक राजसेवक प्रवेश करतो. ) राजसेवक - ( लांब उभा राहून मुजरा करून ) बाईसाहेब, महाराजांच्या आज्ञेवरून मी राजकार्याकरिता जात असतां, येथून आठ कोसांवर वीस हजार संतांचा मेळा बरोबर घेऊन, अत्यंत तेजःपुंज असे एक बालवयी संतश्रेष्ठ आपल्या नगराकडे येतांना माझ्या दृष्टीस पडले ! तेव्हा मी त्यांच्यापुढे लोटांगण चालून आणि हात जोडून, महाराज, आपण इकडे कोणीकडे जात आहां ? ह्मणून मी त्यांना विचारलं. तेव्हां आमच्या चाकणच्या महिपतरावांची कन्या, सीताबाई, या कन्हाडनगरीत राहात आहेत; महिपतरावांच्या आग्रहावरून त्यांना भेटण्याकरिता आह्मी क-हाडनगरीत जात आहों, असे ते मला ह्मणाले ! तेव्हां मी त्यांच्यापुढे आडवा होऊन, त्यांना शरण जाऊन, नगरांत न येण्याविषयी त्यांना प्रार्थना केली; आणि महाराजांच्या अंतःकर