पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/132

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. प्रार्थना करून त्यांना आपल्या वाड्यांत घेऊन येऊं ! ते येथे आले ह्मणजे त्यांचे पूजन करून त्यांना भोजन देऊ ! आणि मग त्यांचा शेषान्नप्रसाद भक्षण करुं ! सीताबाई- बाळा, हा तुझा विचार कसा रे घडून येईल ? आपण हीन, दीन, महापातकी, दुष्ट आह ! साधुसंतांचा नित्य वध करून आपण पातकांचे मंदराचलाएवढे ढीग किरे रचले आहेत ! तेव्हां बाळा, आपल्यासाररव्या घोर पातक्यांच्या घरी ते महावैष्णव संत कोठले रे यायला! एवढं कुठलं रे बाळा आपलं थोर भाग्य ! बाळा, आपण कइंकारली किरे पेरली आहेत, त्यांना अमृतफळे कशी बरं येतील ? खरीज महाराजांची प्रार्थना करून त्यांच्याकरवी या संतश्रेष्ठांना घरी आणविलं असतं, तर बाळा, महाराजही या वेळी नगरांत नाहीत ! । | चाळकृष्णा- आई, महाराज नसले ह्मणून काय झालं ? मीच आमंत्रण देत त्यांना ! महाराज काय आणि मी काय एकच ! साताबाई- बाळा, तू अज्ञान लहान मूल ! तुझं आमंत्रण ते कसं बरं मान्य करतील १ । बाळकृष्णा - आई, पण चलेनास बरे मला घेऊन तेथवर ! मी पोर ह्मणून माझे आमंत्रण त्यांनीं नाहींच पतकरले, तर तेथवर गेल्याने संतदर्शनाचे थोर पुण्य तरी घडेल ! आई, संतदर्शनाचा महिमा थोर आहे, असे तूच परवां वाचीत होतीसना ? आई, संतांना वारंवार नमस्कार केल्याने सकल दोष निघून जातात ! सीताबाई- बाळा, जाऊं बरं आपण त्यांच्या दर्शनाला ( ब्राह्मणांस उद्देशून ) श्रेष्ठहो, महाराजांच्या अनुज्ञेशिवाय संतदर्शनाला जाणं हा शास्त्रांत अधर्म गणला आहे ! तर हा अधर्म मी कसा आचरावा ? । दुसरा ब्राह्मण- देवी, पतिआज्ञेवांचून स्त्रियांनी कोणतेही कर्म करूं नये, असा पतिव्रताधर्म शास्त्रांत सांगितला आहे खरा, तरीपण ज्या योगाने श्रीहरिचरण जोडतील, तो जरी अधर्म असला तरी तो अवश्य आचरावा ! देवी, भरताने मातृवचन ऐकलें असते तर प्रभु रामचंद्राचे चरण त्याला जोडले असते काय ?