पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/133

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

र अंक ४ था. १२५ पितृवचनाचा प्रल्हादानें अव्हेर केला नसता तर भगवान् नरहरि त्याला कसे प्रसन्न झाले असते ! देवी, बळीनें शुक्रवचनाचा अनादर करून श्रीवामनाला त्रिपाद दान अर्पण केलें ! गौळणी भ्रतारांना टाकून श्रीकृष्ण प्रभूच्या रूपीं तल्लीन झाल्या ! ऋषिपन्यांनी भ्रतारांचे वचन मोडून श्रीकृष्ण प्रभूला अन चारलें ! त्यांनी जर शास्त्रवचन पाळिले असते, तर श्रीहरिचरण त्यांना अंतरले असते ! म्हणून सगतों, देवी, शास्त्रविचार मनांत आणून या दुर्लभ संतदर्शनाचा अव्हेर करण्याचे कांहीं कारण नाहीं । संतसेवन हेच शास्त्राचे मुख्य सार आहे ! आणि संतसमागम हाच नित्य वैकुंठवास आहे ! सीताबाई- महाराज, आपण अनुज्ञा करीत आहां, हें साक्षात् भगवंतांचंच वचन आहे असं समजून, मी या माझ्या बाळाला बरोबर घेऊन, आतांच संतदर्शनाला जाते ! ( सीताबाई व बाळकृष्णा व ह्मण‘स नमस्कार करतात. ) । पहिला ब्राह्मण- देवी, तुझे ईप्सित तुला प्राप्त होवो ! आणि युवराजा, संतकृपेने तूं दीर्घायु होऊन या भूतलावर उदंडकाल राज्य कर ! ( सर्व ब्राह्मण निघून जातात. ) सीताबाई- कमळे, चल बाई ! या माझ्या राजहंसाला कडेवर घेऊन चल माझ्याबरोबर ! ( कमळा बाळकृष्णास कडेवर घेण्याकरिता पुढे होते; पण बाळकृष्णा मागे सरतो. ) बाळकृष्णा- आई, मी नाहीं हिच्या कडेवर बसणार ! मी चालतच येईन ग ! सीताबाई- बाळा, असं काय करावं बरं ? आपल्याला फार दूर जायचं आहे ! इतक्या लां ' कसा बरं चालशील ? तं चालतांना थकशील ! तुझे पाय दमतील ! कमळेच्या जवळ जायचं नसलं, तर माझ्या सोनुल्याला मीच कडेवर घेतें ! ( त्याला उचलून कडेवर घेऊन ) आतां झालं ना ? (जातां जातां) कमळे, माझ्या बाळासारखं गुणाचं बाळ त्रिभुवनांत सांपडायचं नाहीं बरं । ( त्याचे चुंबन घेते.) ( सर्व निघून जातात व पडदा पडतो. )