पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/135

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. १२७ करतोस ? हे भक्तराजा, तुझा सुखानंद त्रिभुवनचालक पंढरीनाथ तुझ्या हृदयीं सगुणरूपाने नांदत असतां, तू कां कष्टी होतोस ? मृगनाभीत सुगंध असून, त्या सुगंधाकरितां अज्ञानानें तो जसे घोर वन धुंडीत बसतो, तसा तू आत्मस्वरूपाला न ओळखून श्रीविठ्ठलाच्या वियोगदुःखार्ने व्यर्थ कां शिणतोस ? अरे, दुर्दैवी प्राण्याच्या घरांत अगणित द्रव्य पुरले असून, ते नेत्रांनीं न दिसल्यामुळे, तो जसा उपवास करीत बसतो, तशी तुझी स्थिति झाली आहे ! नामदेव- बापा ज्ञानराजा, जो सनकादिकांचे निजध्यान, नीलग्रीवांचे प्रियभूषण, नारद तुंबरु ज्याचे गुणानुवाद रात्रंदिवस सप्रेम अंतःकरणाने गातात, तो पुंडलीकाचा वरदानी, रुक्मिणीकांत, कासेला पितांबर वेष्ट्रन, कटावर दोन्ही कर ठेवून, जगदुद्धाराकरितां विटेवर उभा आहे, तो भक्तकैवारी विठ्ठलराजा मला दाखवा ! अहो ज्ञानसागरा, मी ज्ञानशून्य आहे. मला योगयुक्तिसाधन माहीत नाही. माझी विश्रांति काय तो जगज्जीवन श्रीपांडुरंग ! तो मला दाखवा ! त्याच्याकरिता माझे पंचप्राण व्याकूळ होत आहेत ! ज्ञानेश्वर- प्रेमळ भक्ता नामदेवा, तो अविनाशी, सर्वव्यापक, सर्वसाक्षी, जगञ्चालक प्रभु, गगनाप्रमाणे सर्वत्र सर्वदेशी व्यापक आहे ! तो जेथे नाही, असे एकही ठिकाण नाहीं ! तो तुझ्या हृदयांत नांदत आहे ! तर हे वैष्णवश्रेष्ठा नामदेवा, भेदभाव मांडून हृदयीं अद्वैत ओळख ? नामदेव- अहो ज्ञानराया, हे तुमचे बोलणे मला लटकें वाटते ! चातक ज्याप्रमाणे आकाशांतून कोसळणारें मेवजलच प्राशन करितात किंवा पतिव्रता ज्याप्रमाणे पतीवांचून इतरांच्या कथा कानाने ऐकत नाहीत, त्याप्रमाणे माझे मन श्रीपंढरीनाथावाचून इतरत्र रमतच नाहीं ! ज्ञानराया, सर्व पदार्थात मृत्तिका भरलेली आहे, तशी ती साखरेतही आहे; म्हणून साखर खोक्यास मागत असलेल्या बालकास, साखरेऐवजीं मृत्तिका दिली, तर त्या मृत्तिकेंत त्याला साखरेची गोडी लागून, त्याचे समाधान