पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/136

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ર૮ श्रीज्ञानेश्वरमहाराज. होईल काय ? तसे आपण जें ज्ञान मला सांगत आहां, ते जरी खरे आहे तरी, सर्वभावेंमजतेचिरूपआवडे ॥ जेपुडालिकापुढे उभेअसे ॥ १ ॥ तोमाझाविठ्ठलदावादृष्टिभरी ॥ आसमीनकरीआणिकांची ॥ २॥ कायावाचामनेंतोचिमजव्हावा ॥ गीतगातांजिवासुखवाटे ॥ ३॥ ऐकावाश्रवणीपहावा तोचिनयनीं । नवजावाजवळूनिदुरीकोठे ॥ ४ ॥ सर्वसुखमजआहेत्याचेपायीं । आणिकांच्यावाहनपडेकदां ।। ५ ।। तेथेंमाझेमनरंगलेभावें ॥ सुखयेणेंजिवेंदेखिलेंडोळां ॥ ६ ।।। ज्ञानेश्वर- नामदेवा, धन्य ! धन्य आहेस तू ! तू आपल्या एकविध भक्तीने श्रीपांडुरंगाला आपल्या स्वाधीन करून घेतला आहेस ! पंढरीनाथाचा तू प्रेमभांडारी असून, देवाचें तें विश्रांतिस्थान आहेस ! आणि ह्मणूनच तुझ्या संगतीचा लाभ म्यां केला आहे ! नामदेवा, प्रेमरसावांचून उदंड ज्ञान काय होय ! तरी नामदेवा, ज्या भक्तीने तू पंढरीनाथाला आपल्या स्वाधीन करून घेतला आहेस, ती भक्ति कशी असावी, भजन, नमन, ध्यान, श्रवण आणि मनन कसे करावें, निजध्यासन कसे, धृति कोणती आणि विश्रांति कशाला ह्मणावी, हे मला समजून सांग ! या गोष्टी तुला विचारून घ्याव्या, ही उत्कंठा माझ्या मनांत फार दिवस आहे ! तरी हे प्रेमळ भक्ता तुझ्या अनुभवाने जो साधन उपाय तुला लाभला आहे तो मला सांग ! | नामदेव-बापा ज्ञानराजा, मी पूर्ण अज्ञानी, तुह्मी प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ति, सर्वज्ञ, उदार, ह्मान तीर्थयात्रेस निवतांना माझ्या आपढरीनाथांनी मला तुमच्या हातीं निरविलें ! असे असून तुह्मी मला अध्यात्मज्ञान विचारिता ! पण, । कृपेचेंपोसमीपंढरीरायाचें ॥ एवढंभाग्यकैचेंजााणवेचें ॥ १ ॥ नोहेंबहुश्रुत नोहेंज्ञानशील ॥ दासमीदुर्बळवैष्णवांचा ॥ २ ॥ अहो ज्ञानसागरा, कल्पतरूने कृपणाच्याद्वारी येऊन याचना