पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/138

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० श्रीज्ञानेश्वरमहाराज. एकटु ॥ वैराग्यउद्भएकनिष्ठ ॥ १५॥ प्रारब्धाचाभीगनेणेदेहस्मृति ।। अखंडतेधृतिनिर्विकार ॥ १६ ॥ निवसनासननिजलाभेसंपूर्ण ॥ नेणेस्वरूपज्ञान संकल्पाचे ॥ १७ ॥ अनुरागेंगोविंदुध्याइजेएकांत ॥ यापरतीविश्रांतिआणिकनाहीं ॥ १८ ॥ कायावाचामनेहामाझाअनुभव ॥ सांगितलासर्वआवडीचा ॥ १९॥ नामाह्मगेहेचिनेलविलेतेणें । उदारसर्वज्ञपांडुरंगें ।। २० ।। ज्ञानेश्वर-नामदेवा, धन्य ! धन्य आहेस तू ! अहो संतहो, आजपर्यंत अनेक विष्णुभक्त झाले आणि यापही अनेक होतील, परंतु माझ्या नामदेवाचे हे गोड बोल केवळ कवित्व नसून, हा निरुपम अमृतरस आहे ! अहो वैष्णवहो, या भूतलावर अनेक शास्ववेत्ते निर्माण होतील, अनेक विद्यावंत निपजतील, अनेक बुद्धिमान भेटतील, अनेक कवित्वकुशलता दाखवितील, अनेक आत्मज्ञानाप्रत जाणतील, अनेक वज्रासनी बस्न योगश्रेष्ठ होतील, अनेक आंगीं विरकता धारण करतील, अनेक श्रेष्ठत्व संपादून त्रिलोकीं पूज्य होतील, अनेक पाठक बनतील, आणि अनेक वाचाळपणा दाखवितील, परंतु माझ्या नामदेवासाररवी ही अपार सुखविश्रांति कल्पांतही कोणाला मिळणार नाहीं ! अहो संतहो, माझ्या नामदेवाने सांगितलेली ही जिवांची रखूण तुझी आपल्या जिवाशी जतन करून ठेवा, आणि त्याप्रमाणे वागा ! झणजे तुह्मीही माझ्या नामदेवाच्या थोर भाग्याचे वाँटेकरी व्हाल ! या माझ्या संतमुकुटमणी नामदेवाच्या श्रेष्ठत्वाची रखूण एक श्रीपांडुरंगच जाणे ! | ( इतक्यांत क-हाडचा राजा मराजा, वाचा मुलगा बाळकृष्णा व त्याची आई सीताबाई, दासीसेवकजनांसह प्रवेश करतात. ) बाळकृष्णा- आईग ! पाहा तरूछायीं, सकल संत बसले ॥ ध्रु० ॥ वाटे खचितची आज आपुले, पूर्वपुण्य फळलें ॥ १ ।। उदार मूर्ति ज्ञाननभींचे, मेघ पाहा वळले ॥ २ ॥ प्रेमें कीर्तन करिती हरीचे, देहभान नुरलें ॥ ३ ॥