पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/139

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. १३१ ग्रपंचतळमळ विसरुन सारे, श्रीरूप रमले ॥ ४ ॥ कीर्तन कल्लोळाच्या नादे, अंबर हे भरलें ॥ ५ ॥ भजनाचा हा थाट पाहुनी, मन माझे रिझलें ।। ६ ।। या संतांच्या दर्शनमात्रे, सकल शीण हरले ॥ ७ ॥ संत वोल ते अमृतगंगा, पीतां ताप पळे ।। ८ ॥ दोन भाषण प्राथुनि यांना, नेऊं घरीं आपुले ॥ ९ ॥ मोक्षसुखाची जोड मेळवू, पूजुनी भावबळे ॥ १० ॥ शेषान्नाचा प्रसाद मिळतां, जाइल भय सगळे ।। ११ ॥ ( श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या पायांवर लोटांगण घेऊन ) संत माउली सकल जगाची, जाणुनी पद धरिलें ॥ १२ ॥ ( नमस्कार केल्यावर बाळकृष्णा श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पुढे खाली दृष्टि देऊन उभा राहतो. ) ज्ञानेश्वर-अहो सतहो, गळ्यांत मोहनमाळा घालून आणि कर्णीत ज्ञानविज्ञान निवडणारी कुंडलें घालून नासाग्र दृष्टि देऊन, समचरणीं उभी राहिलेली ही शामतनु सुकुमार सुंदर मूर्ति पाहून, हा साक्षात् गोकुळवासी श्रीकृष्ण प्रभु आपणा सर्वांना दर्शन देण्याकरितां गोकुळीहून येथवर धांवत आला आहे, असे मला वाटते ! ( बाळकृष्णास कडेवर उचलुन घेऊन ) हे भगवंता गोपाळकृष्णा, तुझ्या दर्शनाने आज मी कृतार्थ झाले ! आता या श्रेष्ठासनावर बसून आम्हां सर्वत्रांच्या हातून पूजा ग्रहण करावी, आणि या ज्ञानदेवासह सकल संतांस धन्य करावें ! | बाळकृष्णा- ( खाली उतरण्याचा प्रयत्न करून ) अहो संतश्रेष्ठा, महाराजा ज्ञानदेवा, मी गोकुळवासी भगवान् श्रीकृष्ण नमुन क्षुद्र मानवदेही क-हाडनगराधिपति रामराजे यांचा अज्ञ बालक बाळकृष्णा आहे ! आणि ती पलीकडे माझी माता सीताबाई उभी आहे ! तुझां सर्व श्रेष्ठांना घरी नेऊन तुह्मां समथांचे भक्तिभावाने पूजन करावे आणि तुह्मां समर्थांना भोजन देऊन तुमचा शेषान्नप्रसाद भक्षण करावा, ही इच्छा पोटीं धरून माझी माता मला बरोबर घेऊन, तुह्मां श्रेष्ठांना आमंत्रण देण्याकरितां येथवर आली आहे ! तरी तुह्मी समर्थांनी आमचे हैं।