पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/14

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. जान्हवी-( लुगड्याचा पिळा पिळतां पिळतां ) हो; खरंच ते ! तुला रिकामपण कुठलं असायला ? कारण कामधाम नी नेमधर्म कायतो तुझ्याच घरीं ! आम्ही आपल्या निकाम्या, उठवळ, ना आम्हांला देव ना आम्हांला धर्म ! कां, असंच किनई वल्लरीबाई ? पण आमच्या घरीं कांहीं पुरुष नाहीं हो चुली फुकीत बसत ! आमच्या इथे तर, ऐकलंत का वल्लरीबाई, रोज घंगाळभर देवांची पूजा होते आहे ! नी देवांच्यापुढे काडवाती, बोटवाती, नी फुलवाती, बारा महिने जळतात आहेत त्या वेगळ्याच ! | उत्तरा- ( पाण्यात बुचकळून दगडावर ठेविलेल्या धुण्यांतील एक लुगडे पाण्यांत आघळत आघळत ) अग जान्हवी, या वल्लरीला किनई नको बाई कांहीं वेडंवाकडं बोलू. अग, हिला वैकुंठास नेण्याकरिता स्वर्गातून लवकरच विमान उतरायचं आहे हो खालीं ! नी त्याचा आला आहे तिला आतांशीं डौल ! ह्मणून म्हणते हिच्याशी गोड बोलत जा; ह्मणजे असलंच तुझ्या प्रारब्ध तर हिच्याबरोबर तुलाही वैकुंठाची यात्रा घडेल अनायासं ! | वल्लरी- है. वोला, तुमच्या मनाला येईल तें खुशाल तुम्ही । बोला ! मेली थट्टाच करायची, मग काय ? मन मानेल ते बोलावं ! | जान्हवी- ( लुगडे दगडावर आपटरां आपटतां ) अस्सं, अस्सं ! अगबाई ! वल्लरीवाई खरंच का हे ? मग आम्हांला न्याल का तुमच्याबरोबर विमानांत बसवून ? आंत नसलं बस्तुं यायचं तर निदान तुमच्या विमानाचे रवूर तरी धरूं या हो पण आम्हांला ! म्हणजे उत्तरा नी मी, आम्ही दोघीजणी येऊं ह्मणते सहजी गोष्टी बोलत तुझ्याबरोबर वैकुंठाला ! पण उत्तरे, विमान येण्यासारखा असा नेमधर्म तरी कोणता चालला आहे आतांशीं वल्लरीवाईचा, हे सांगशील तर खरं ? | उत्तरा- ( पिळा पिळतां पिळतां ) इश्श ! जलं इतकं देखील का नाहीं तुझ्या लक्षात आलं ? तू किनई अगदीच वेंधळी हो ! अग, अलंकापुरीहून आलेले वल्लरीचे विठू भाऊजी नी रुक्मिणी जाऊबाई ( जान्हवी नाक मुरडते ) कां ? नाक कां मुरडलंस ? नाहींत का तीं साक्षात् पंढरीचीं विठोबा-रखमाई ! त्यांची सेवा