पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/140

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ श्रीज्ञानेश्वरमहाराज, एवढे कोड पुरवून आह्मांला धन्य करावें ! ( बाळकृष्णा खाली उतरून श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे चरण धरतो. श्रीज्ञानेश्वरमहाराज त्यास 'दीर्वायुष्मान् भव ? असा आशीवाद देतात. सीताबाई श्रीज्ञानेश्वर महाराजांस नमस्कार करते. ते तिला * अखंड सौभाग्यवती पुत्रवती भव ? असा आशीर्वाद देतात.) ज्ञानेश्वर- महापतिव्रते मातोश्री सीताबाई, तुला येथवर ये प्याचे श्रम मी दिले याबद्दल मला क्षमा कर ! राजे रामराजे अलीकडे साधुसंतांचा छळ करून त्यांना सुळी देण्यास प्रवृत्त झाले आहेत असे ऐकले, आणि ह्मणून आह्मीं येथेच शिबिरें देऊन राहिलों, आणि तुला येथवर येऊन जाण्याविषयी मी निरोप पाठावला! मातोश्री, तुझे कुशल आहे ना ? महिपतराव मजवर थोर लोभ करितात ! तसाच तुझाही लोभ मजवर अखंड असावा. मातोश्री, अशा अनिष्ट वेळी नगरांत येण्याविषयी तुझी अनुज्ञा उक्त नाही असे मला वाटते ! तुझ्यासारख्या पुण्यशील साध्वी मातुश्रीच्या आणि ( बाळकृष्णास जवळ घेऊन ) या श्रीकृष्णस्वरूप बालकृष्णाच्या सुखकर दर्शनाने माझे नेत्र पुनीत झाले आहेत ! तेव्हां आतां नगरांत येऊन या नेत्रांना याहून अधिक तो कोणता सोहळा पहावयाचा राहिला आहे ? आणि बाळा, आह्मीं नगरांत आल्यावर राजदुतांनी राज नीं राजाज्ञेने जर आह्मांला सुळावर चढविले, तर मग कसे बरे होईल ? बाळकृष्णा- अहो संतश्रेष्ठा, तुमच्या हृदयांत श्रीपति नांदत आहे ! तुह्मी साक्षात् श्रीविठ्ठलमूर्ति आहां ! तेव्हां तुह्मांला कोण काय करणार ! माझी आई मला सांगत असते कीं, तुह्मी संतश्रेष्ठ, विठोबारायाचे भक्त, यमालाही शरणागत आणतां ! तुह्मी आपल्या सुकतांच्या अग्नीने विश्वांतील महापातकांची होळी करतां ! तुझी श्रेष्ठांनी हरिनामघोषाने कुंभीपाक आस पाडले आहा ! आणि हरिकीर्तनाने हरिभक्तांचें यमपाशही तोडून टाकले आहा ! अशा ज्या तुह्मां सद्रूंचा प्रताप त्या तुमच्यापुढे काळ कसा उभा राहील? कौरवांनीं पांडवांचा प्राणघात करण्यासाठी अनेक उपाय केले, पण पांडवांच्या हृदयांत माधव नित्य वास करीत होता, ह्मणून.