पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/142

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| १३४ श्रीज्ञानेश्वरमहाराजः च्या हृदयांतील साधुसंतांबद्दल द्वेषभाव नष्ट होईल ! समर्थांचं बोधवचन ऐकून मी कोण, मी येथे कशाला आलो, मी आपलं हित की अहित करून जात आहे, याची महाराजांना ओळख पटून महाराज सुखरूप होतील! नी ते सुखरूप झाले, झणजे | आम्हीही सर्व सुखरूप होऊ ! या माझ्या तान्ह्याला मी समथाँ च्या ओटींत घातला आहे ! तरी हे बाळ आपलंच आहे असं समजून समर्थांनी याच्याकडे प्रेमदृष्टीनं पहावं, नी याच्यावर समर्थकृपेची सावली घालावी ! झणजे माझ्या बाळाला कशाचंही भय उरणार नाहीं ! ( बाळकृष्णा श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पायांवर डोके ठेवितो. ) माझ्या बाळानं सद्रुरुचरणीं लोळण घेतली आहे, नी मीं सद्रूंपुढे हा पदर पसरला आहे, तरी अहो ज्ञानराजा, आम्हांला आता उदास करूं नये ! ज्ञानेश्वर- हे कल्याणी, असाच तुझा आग्रह आहे, ( बाळ • कृष्णास उठवून आणि त्याच्या तोंडावरून हात फिरवून ) आणि बाळा, असाच तुझा छंद आहे, तर येतों बरे आम्ही तुझ्या घरीं! अहो संतहो, या बाळकृष्णाचे आमंत्रण आम्हीं वेतले आहे ! तरी तुझी सर्वांनी आझांबरोबर प्रसादाला आले पाहिजे ! बाळा, आम्ही येत बरे तुझ्या मागोमाग ! ( बाळकृष्णा पुन्हा पाया पडतो व सीताबाई पुन्हा नमस्कार करते. ) साताबाई- (चाळगास जवळ घेऊन त्याच्या तोंडावरून हात फिरवून ) वाळा, समर्थनीं कृपाळ होऊन तुझी आस पुरी करण्याचं कबूल केलं ! आतां झालंना तुझ्या मनासारखं ? ( श्रीज्ञाने श्वरमहाराजांच्या पायाची तीट बाळरुष्णाच्या कपाळी लावून) बाळा, संतचरणाची ही तीट मी तुझ्या कपाळी लावते, ह्मणजे तुला कशाचंही भय उरणार नाहीं ! अहो सद्गुरुसमर्था, माझ्या बाबांनी तुमच्या चरणाचा लळा मला लावून दिला असल्यामुळे सद्रुचरण आठवून मी रात्रंदिवस सद्रूंची वाट पहात होते; तो माझा हेतु आज पूर्ण झाल्यामुळे मी धन्य झाले ! ( श्रीज्ञानेश्वरमहाराजांस पुन्हा नमस्कार करून बाळकृष्णाला कडेवर घेऊन जाऊ लागते. )