पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/143

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. १३५ बाळकृष्णा-( मागे वळून श्रीज्ञानेश्वरमहाराजांकडे पाहून ) अहो सद्रुसमर्था, माझे तातमहाराज माझ्यावर आतांशी फार रागवायला लागले आहेत ! तर तुह्मी घरी आलो झणजे, माझ्यावर रागावत जाऊ नका, असे तातमहाराजांना सांगा बरें ! सीताबाई- ( बाळकृष्णाचे चुंबन घेऊन) सांगतील बरं बाळ ! (दासीसेवकजनांसह निघून जात असतां ) बाळा! असं बोलू नये! ( सीताबाई बाळकृष्णाला घेऊन दासीसेवकजनांसह निघून जाते.) नामदेवदुर्लभनरदेहझालातुह्मांआह्मां ॥ येणेंसाधूप्रेमाराघोबाचा ।। १ ।। अवघेहातोहातींतराभवसिंधु ॥ आवडींगोविंदुगाऊंगीतीं ॥२॥ हिताचियागोष्टीसांगोंयेकमेकां ।। शोकमोहदुःखानिरसुतेणें ।। ३।। येकमेकांकरूंसदांसावधान ॥ नामअनुसंधानतुटोंनेदूं ॥ ४ ॥ घेऊसर्वभावेरामनामदीक्षा ।। विश्वाससकाळिकांहेचिसांग ॥ ५ ॥ नामाह्मणेशरणारिघोपंढरीनाथा ॥ नुपेक्षीसर्वथादीनबंधु ॥ ६ ॥ (भजन करीत सर्व संत निघून जातात. ) प्रवेश तिसरा. स्थळ- क-हाड नगरी- राजवाड्यापुढील गच्ची. बाळकृष्णा- ( आंतून धावत धांवत येऊन मागे वळून पाहन ) मी नाहीं जा- तू मला धरूं नकोस आं ! आपला विचार पाहा ! नाहीं तर मी आईला सांगून तुझी खोड मोडीन ! तू काय समजली आहेस ? ( असे बोलत पळत पळत गच्चीच्या पाय-यां- कडे जातो. ) कमळा- ( बाळकृष्णाच्या मागे धांवत येऊन ) महाराज ! मी आतां न्हातों असं तुम्हीं कबूल केलंत, नी म्हणून पिंगलेला सांगून, चौरंग मांडवून, तिच्याकडून तुमची न्हायची तयारी करविली ! नी मी तुमच्या आंगावरचा पोशाक उतरायला