पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/144

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. लागलें, तों तुह्मीं माझ्या हाताला झटकारा देऊन, एकदम धांवत निघून आलात, ते एवढ्याकरितांच का ? दम धराहो ! मीच आता अगोदर, महाराज माझं ऐकत नाहीत, ह्मणून बाईसाहेबांना जाऊन सांगते ! नी त्यांना इथवर घेऊन येऊन, हे चांगलं का झणून पुसते ! ( बाळकृष्णा गच्चीवर चढू लागतो. ) महाराज, पाहाहो ! तुम्ही माझं न ऐकतां आपलंच खरं करीत आहां ! पण संभाळा ! ही मी चाललें वरं बाईसाहेबांना इकडे घेऊन यायला ! का होता खालीं ? इश्श ! हा कोण जला मुलखाविरहित उतावीळपणा ! थोरले महाराज शिकारीहून परतले, असं सांगत सांडणीस्वार हा इतक्यांतच ना परत आला ? त्याला येऊन अजून घटका देखील पुरी झाली नाहीं ! खरंच पण हो ! शर्थ झाली बाई तुमच्या अधीच्या स्वभावापुढे ! बाळकृष्णा- ( गच्चीवर चढून जाऊन व गच्चीच्या सज्जावर उभा राहून ) एक घटका झाली नाहीं का ? खोटी नाही तर ! किती तरी वेळ झाला सांडणीस्वाराला परत येऊन ! तरी अजून तातमहाराज कां ग परत येईनात ? त्यांची वाट पहात मी इथे असा बसणार जा ! कमळा- महाराज, असं काय बरं करावं तें ? तुह्मी शहाणे ना ? आतां घटकेचा प्रहर का होणार आहे ? तुमचं न्हाणं होत आहे, तंवर थोरले महाराज येतील बरं परत ! बाळकृष्णा- ( लांबवर दृष्टि देऊन ) कमळे ! अग कमळे ! ते पाहिलेस का घोडेस्वार कसे भरधांव घोडे फेकीत इकडे दौडत येत आहेत ते ! तातमहाराजांच्या बरोबरचेच हे घोडेस्वार असतील, नाहीं ग ? अबब ! या घोडेस्वारांच्या दवडीनें तो पाहिलास का धुराळा आकाशांत किती उंच उडाला आहे तो ! पण कायग कमळे, तातमहाराजांचा अंबारीचा हत्ती अजून कां ग मला कोठे दिसेना ? कमळा- महाराज, इतका धुराळा उडाल्यावर, त्यांत महाराजांचा हत्ती इतक्या लांबून कसा बरं दिसेल तुह्मांला ? । बाळकृष्णा- कमळे, तातमहाराजांच्या बरोबरच्या शिकारी