पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/145

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- अंक ४ था. १३७ लोकांपैकी एक देखील शिकारी अजून कां ग माझ्या दृष्टीस पडेना! श्रीज्ञानेश्वरमहाराज वाड्यांत येण्यापूर्वी तातमहाराज येतील ना ग नगरांत परत ? कमळा- येतील हो येतील ! थोरले महाराज किनई आता येतील! तुह्मी कांहीं काळजी करूं नका ! पण आतां येतांना न्हायला ? तुमचं न्हाणं अजून कां झालं नाही ह्मणून बाईसाहेब रागावतील ! मग त्यांना मी काय बरं उत्तर देऊ ? । बाळकृष्णा- (आनंदानें ) कमळे, दिसला ग दिसला मला तातमहाराजांचा अंबारीचा हत्ती ! आणि शिकारी लोक देखील दिसायला लागले मला आता ? तू वर येऊन पहा तर खरा हा अंबारीचा हत्ती आणि हे शिकारी लोक येथून किती अगदी लहान दिसत आहेत ते ! हत्ती तर किनई येथून आपल्या कपिलेच्या वासराएवढा दिसतो आहे ग ! आणि हे शिकारी लोक माझ्याहूनही लहान लहान मुलांएवढे दिसत आहेत ग ! वर येऊन पहा तर खरी ही गमत ! कमळा- मला नको ती गमत पाहायला ! थोरल्या महाराजांचा अंबारीचा हत्ती दिसला ना तुह्मांला आतां । आतां झालंना तुमच्या मनाचं समाधान ? या तर कसे आतां खालीं ! नी थोरले महाराज वाड्यांत येण्यापूर्वी, न्हाऊन नी आपला पितांबर नेसून, व्हा श्रीज्ञानेश्वरमहाराजांना सामोरे जायला तयार ! वाळकृष्णा- मी नाहीं जा इतक्यांत न्हायला येत ! कमळा- ह्मणजे ! थोरले महाराज आतां घटकेच्या आंत नगरांत येतील, ही अजून देखील नाहीं का तुमच्या मनाला खातरी पटली ? मग बरीक खरोखरीच शर्थ झाली बाई ! बाळकृष्णा- तातमहाराज वेशीच्या आंत शिरलेले जेव्हा मी पाहीन, तेव्हा मग येईन मी न्हायला ! नाही पण तसे देखील नव्हेच ! तातमहाराज आणि मी आह्मी दोघेही आज बरोबरच आंघोळ करूं ! आणि मग गुरूजींना बरोबर घेऊन, आह्मी दोघेही सद्गुरु ज्ञानेश्वरमहाराजांना हातीं धरून वाड्यांत घेऊन