पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/146

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. यायला, वाड्याच्या दक्षिणेच्या थोरल्या दरवाजाजवळ त्यांची वाट पाहात उभे राहूं ! कमळा- दोन घटका झाल्या, बाईसाहेब आंग धुवून देवातुळशीची पूजा करीत बसल्या आहेत ! त्या तुळशीपुढून आता उठतील ! नी तुम्ही अजून पारोसेच आहां असं त्यांनी पाहिलं झणजे तुमच्यासाठी मला बरीक रागं भरतील! ह्मणून म्हणते, पुरे झाला आता हा छांदिष्टपणा ! | वाळकृष्णा- कमळे, अशी कायग तू घाई करतेस ? ते बघ तातमहाराज मघापेक्षां आता किती तरी जवळ आले आहेत ! ते आता इतक्यांत वेशीपाशी येतील ! ते वेशीच्या, आत शिरले की मी येत न्हायला ! मग तर झालें ना ? कमळा- तें कांहीं नाहीं ! मी आतां तुमचं कांहीं एक ऐकायची नाहीं ! तुह्मी बन्याबोलानं खाली उतरत ? का मी येऊ वर, तुह्मांला उचलून खाली घेऊन यायला १ । बाळकृष्णा- ये बरें ! ये बरें ! पाहातों तू मला कशी उचलून घेऊन जातेस ती ! मी मुळीं तुझ्या हातीं सांपडेन तर कीं नाहीं तू मला उचलून घेऊन जाणार खाली ? । कमळा- महाराज, असं वेड्यासारखं काय करावं बरं ! ( बाळकृष्णा मी खाली येत नाही असे खुणेने सुचवितो ) अस्सं का ? आलेच बरं का तर मी वर ! का गुण्यागोविंदानं उतरतां खालीं ? । वाळकृष्णा- मी नाहीं उतरत जा ! कमळा- तुम्ही तसे कुठले ऐकायला ? ही आलेच मी वर ! ( कमळा पाय-या चढून वर जाऊ लागते. बाळकृष्णा तिच्या हाती न सांपडण्याचा प्रयत्न करीत असतां पाय घसरून गच्चीवरून खाली फरशीवर पडतो. तेव्हां त्याचे डोके दगडावर आपटून त्यांतून रक्त वाहूं लागते व तो बेशुद्ध होतो. कमळा घाईघाईने पाय-या उतरून बाळकृष्णाजवळ येते व त्याची ती अवस्था पाहून ) अरे देवा ! है। कायरे झालं ! ( बाळकृष्णाला उचलून मांडीवर घेऊन व त्याच्या तोंडावरील रक्त पुसून ) महाराज, कायहो ही तुमची अवस्था झाली !!