पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/147

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३९ अंक ४ था. धवा हो धांवा ! अहो तिकडे कोणी आहे का ? कोणी तरी जाऊन बाईसाहेबांना इकडे बोलावा हो ! महाराज गच्चीवरून खाली पडून बेशुद्ध झाले आहेत, असं सांगून, त्यांना चटकन. इकडे घेऊन या हो ! ( तिच्या ओरडण्यास कोणी उत्तर देत नाहीं व कोणी येतही नाही असे पाहून ) इथे जवळपास कोणीदेखील नाहीं काहो ? महाराज ! अहो महाराज ! अग बाई ! हे तर अगदीच बेशुद्ध झाले ! यांची कांहीं धडगत दिसत नाहीं बाई मला! अरे देवा ! आता तर हा रक्ताचा पाट मघाच्यापेक्षा अधिकच वाहू लागला ! अग चांडाळणी, अशी कशीग तुला दुष्ट बुद्धि झाली ! अहो, कोणी आहे का तिकडे ? नाही ना ? कोणीच नाहीं तिकडे ? ( बाळकृष्णास उचलून हातावर घेऊन उठून ) महाराज ! अहो महाराज ! ( असे ह्मणत आहे इतक्यांत पडदा पडतो. ) । प्रवेश चौथा. स्थळ- राजवाडा- राजवाड्यांतील देवघरापुढील भव्य दालन. ( सीताबाई तुळशीची पूजा करीत बसली आहे. तिच्याजवळ तिची दासी गिरजा उभी आहे. दालनाच्या मध्यभागीं श्रीज्ञानेश्वरः महाराजांकरितां एक उच्चासन मांडलेले आहे व या उच्चासनाजवळ पूजासाहित्य सिद्ध करून ठेविलेले आहे असा पडदा उघडतो. इतक्यांत कमळा बाळकृष्णाला हातावर घेऊन ओरडत येते, व तिच्या मागून पिंगलाही प्रवेश करते.) कमळा- बाईसाहेब ! अहो बाईसाहेब ! धांवा हो धाँवा ! उठा.! धाकटे महाराज गच्चीवरून पडून, त्यांची ही पाहा काय । अवस्था झाली आहे ती ! सीताबाई- ( घाबरून उठून कमळेकडे धावत धावत जाते व बाळकृष्णास तिच्या हातांवरून आपल्या हातांवर घेते; व त्याची ती भयंकर अवस्था पाहून नेत्रांपुढे अंधेरी येऊन कमर मोड्न