पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/148

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० | श्रीज्ञानेश्वरमहाराज. आल्यामुळे मटकन खाली बसते. पिंगला घाईवाईने पाणी आणून ते बाळकृष्णाच्या डोळ्यांना लावते व गिरजा पंखा आणण्याकरिता धावत निघून जाते ) हाय रे हाय ! बाळा ! काय रे तुझी ही अवस्था झाली ! ( गिरजा पैसा घेऊन परत येते व बाळकृष्णाला वा घालू लागते. ) पिंगले, वैद्यराजांच्याकडे असाल तसे या असा माझा निरोप पाठीव, नी महाराज शिकारीहून परत आले असले तर त्यांना चटकन् इकडे घेऊन ये ! ( पिंगला निघून जाते. गिरजा कमळेजवळ पंखा देते व आपण बाळकृष्णाच्या तोंडावरील रक्ताचे ओघळ पदराने पुसू लागते. कमळा बाळकृष्णास परव्यानें वारा घालू लागते.) कमळे, तुला नी पिंगलेला माझ्या तान्ह्याला न्हाऊ घाला, असं ना मी सांगितलं होतं ? नी असं असुन हे माझं बाळ गच्चीकडे ग कसं गेलं ? नी हें इतकं विव्हळ होऊन पडेपर्यंत तुह्मी दोघीही याला सोडून कुठे ग गेला होता ? कमळा-( रडत रडत ) बाईसाहेब ! पिंगलेनं महाराजांची न्हायची तयारी केलीन तेव्हा मी महाराजांच्या अंगावरचा पोशाक उतरूं लागलें. तो एकाएकीं यांच्या मनात काय आलं ते कोण जाणे ! हे आपले माझ्या हाताला झटकारा देऊन वाड्याच्या पुढच्या थोरल्या दरवाजावरच्या उंच गच्चीकडे धांवत सुटले ! मी यांच्या मागोमाग धांवले नी यांना, महाराज गच्चीवर चढू नका, असं ओरडून सांगू लागलं! पण माझं न ऐकता, हे आपले गच्चीवर चढले! महाराज, तुह्मी शहाणे ना ? तुह्मांला न्हायला उशीर होत आहे ! खाली उतरा ! अशी मी यांची पुष्कळ विनवणी केली ! पण थोरले महाराज शिकारीहून कुठवर परत आले आहेत, हे पहात मी इथे असा बसणार, असं हे मला झणू लागले ! श्रीसद्गुरुज्ञानेश्वरमहाराज वाड्यांत येण्यापूर्वी थेरले महाराज त्यांच्या दर्शनाला येतीलना ग नगरांत परत ? असं तितक्यांतल्या तितक्यांत यांनी मला कितीदा तरी विचारलं ! नी ते पहा मला घोडेस्वार दिवं लागले! आतां महाराजांचा अंबारीचा हत्ती मला दिसला ! अशी बडबड यांनी सुरू केली ! महाराज, उतरा खालीं ! असं मी यांना पुष्कळ सांगितलं, पण हे आपला