पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/15

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ अंक १ ला. करते आहे हो वल्लरी आतांशी रात्रंदिवस मनोभावानं ! मग विमान यायला कांहीं वेळ का लागायचा आहे ? वल्लरी-जान्हवी, जानें बाई मी आपली. उत्तरा- वल्लरी, जायचंच तर जा; पण मी सांगते एवढे ऐकून ठेव हो; ह्मणजे झालाच तर उपयोगच होईल तुला माझ्या सांगण्याचा ! हे बघ, विठू भाऊजींची सेवा नाहींच पुरी पडली, तर त्यांच्याच पोट आलेले निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान- साक्षात् शंकर, विष्णु, ब्रह्मदेव-नी त्यांची बहीण मुक्ताबाई- साक्षात् आदिमाया -यांची सेवा कर ! ह्मणजे ती प्रसन्न होऊन वैकुंठांतलं विमान आणवितील बरं तुझ्याकरितां खाली ! ( इतक्यांत उर्मिळ तांदुळाची दुरडी घेऊन येते.) जान्हवी-( लुगडे झाइतां झाडतां ) अस्सं का ? हे नव्हतं वाई मला ठाऊक ! उर्मिळे, ऐकलंस का हे तू ? आपेगांवच्या कुळकरण्याचा मुलगा, वेडा विठ्ठलपंत, पंढरीचा विठोबा झाला बरं का ! नी त्या विठ्ठलपंताची कारटी ही शंकर, विष्णु, ब्रह्मदेव नी आदिमाया यांचे अवतार प्रगटले हो या कलियुगीं ! ( वल्लरीस उद्देशून ) फार चांगलं बाई ! मग, वल्लरीबाई, देवाला भेटायला आतां कहीं वैकुंठाला जायची गरज उरली नाहीं तुम्हांला ! ( वल्लरीपुढे हात ओंवाळून ) अहाहा! वल्लरी -( घागर खाली ठेवून ) जान्हवीबाई, अहाहा म्हणून माझ्यापुढे हात नकोत ओवाळायला. आहेतच ते प्रत्यक्ष देव; नी तुमच्या आमच्यासारख्या पातक्यांचा उद्धार करण्यासाठीच ते आले आहेत बरं का अवतार घेऊन या कलियुगी, समजलीसे ? | उमिळा-( तांदुळाची दुरडी पाण्यात बुडवून वर उचलून ) अम्हांला उद्धरून न्यायला आले आहेत का वर्णसंकर करून सारी पृथिवी बुडवायला आले आहेत, ते अलंकापुरीतल्या शुचिभूत ब्राम्हणांना पुसून तरी ये म्हणते एकदा ! म्हणजे तेच देतील तुला याचं चांगलं उत्तर ! काय ग जान्हवी, खरं कीं नाहीं । जान्हवी-( लुगडे झाडतां झाडतां मध्येच थबून ) ब्रम्हचारी