पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/150

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૪૨ श्रीज्ञानेश्वरमहाराज. बोलमशहांसून । दीनगायमीवत्सा । जाशीकसाटाकुन । नवमासतूजउदरीं । वाहिलेहालसोसून । फिर विशीमुखकांरे । आसतुझीमनींधारली। नकोजाऊंपाडसाटाकानिममतासगळी ॥ १ ॥ एकदांकंठींमीठी । लाडक्याप्रेमेघाली । अमृतबोलतूझे । ऐकूदेएकवेळीं । चुंबुदेमृदुगालां । वदनवरीउचली । मत्प्राणबाळमाझे( इतक्यांत बाळकृष्णास उचकी लागून त्याचे प्राणोत्क्रमण होते. ) हाय ! हाय ! कमळे गेला ग गेला ! माझा बाळ मला सोडून परलोकीं गेला ! साधूचा शाप माझ्या बाळाला पुरा किग भोवला. बाळा ! सुंदरा ! मनमोहना ! तुला साधुशाप बाधू नये, ह्मणून मी तुला श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या ओटींत घालून, तुझ्या कपाळीं त्यांच्या चरणरजाचा अभयतिलक किरे लाविला ! पण कमळे, माझ्या दुर्दैवानं अखेर आपलंच किंग खरं केलं! गिरजे, आतां मी काय करूं ग ? या माझ्या राजहंसाला मी आतां कुठे पाहूं ? बाळा, संतचरणीं तुझी फार आवड ! ह्मणून माझ्याबरोबर दुडदुड धांवत येऊन तू संतांना आमंत्रण दिलंस ! नी ते घरीं आले ह्मणजे मी त्यांची पूजा करीन, मी त्याचे चरणतीर्थ घेईन नी त्यांचा शेषान्नप्रसाद भक्षण करून धन्य होईन ! अशी इतका वेळ तू एकसारखी घोकणी घेतली होतीस ! नी आतां ते येण्यापूर्वीच ते वैकुंठीं कसारे निघून गेलास ! तान्ह्या, आतां संतांना कोणरे सामोरा जाईल ? त्यांना हात धरून इथवर कोण आणील? त्यांची पूजा करून त्यांचे चरणतीर्थ कोण घेईल ? नी त्यांचा शेषन्नप्रसाद मी आता कोणाच्या रे मुखांत घालू ? बाळा ! श्रीज्ञानेश्वर सद्गुरुंनीं तुला पाहिलं, तेव्हां तं साक्षात् श्रीकृष्णप्रभूचीच बालमूर्ति आहेस, असा किरे त्यांना भास झाला ! नी अशा भावनेनं त्यांनीं तुला कडेवर उचलून घेऊन, तुला हृदयाशा घट्ट किरे धरिलं ! तेव्हा बाळा, मला मोठी धन्यता वाटून, तुला आतां साधुशाप बाधणार नाही, अशी शुभशकुनाची गांठ मा पदराला बांधली ! पण बाळा अखेर ते सारंच किरे व्यर्थ झालं ! गिरजा- बाईसाहेब, असा धीर सोडू नका ! युवराजांना