पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/151

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था.. १४३ या वेळीं भयंकर मूच्र्छा आली आहे; पण अमळशानं ते चांगले शुद्धीवर येतील! ( इतक्यांत रामराजा, राजवैद्य व पिंगला घाईघाईनें प्रवेश करतात.) सीताबाई-( रामराजाकडे पाहून ) महाराज ! आलांत का हो ? ही पहा माझ्या बाळाची काय दशा झाली आहे ती ( रामराजा मुलाजवळ जाऊन त्याच्या गळां पडून प्रेमाने त्याचें। चुंबन घेतो व राजवैद्य मुलाचा हात धरून त्याची नाडी पाहतात. ) रामराजा-( सद्गदित होऊन ) माझ्या लाडक्या ! तुझ्या तोंडाकडे देखील पाहवत नाहीं रे ! तू माझ्याबरोबर शिकारीला येण्याचा हट्ट धारलास, तो तुझा हट्ट म्यां निर्दयाने पुरविला नाहीं, तरी तू मजवर न रागावतां, वाळा, माझ्याकडे आपले पंचप्राण गुंतवून आतुरतेने माझी वाट किरे पाहत होतास ! आणि मला यायला उशीर लागला ह्मणून कारे आता माझ्यावर रागावलास ? ( राजवैद्य बाळकृष्णाचा हात सोडून तोंड फिरवून नेत्रांना पदर लावितात, ते पाहून ) हाय ! हाय ! वैद्यराज, शेवटी माझ्या तान्ह्याने मला अखेरचेच सोडले ना ? लाडक्या ! ( असें ह्मणून शोकवि - व्हळ होऊन बाळकृष्णाच्या आंगावर पडतो. व पुन्हा उठून ) वैद्यराज, ते पहा, संतहल्यापापरूपीं पिशाच्च माझ्या नेत्रांपुढे उभे राहून, राजा ! हा साधुशाप तुला बाधला ह्मणून मला सांगत आहे ! हाय ! हाय ! म्यां चांडाळाने आपण होऊनच किहो आपला घात करून घेतला ! | सीताबाई- महाराज ! खरंच हो खरंच ! आपलीच क्रिया आपल्याला बाधली बरं ! आपणच आपल्या हातांनी आपला घात करून घेतलात ! नी आतां शोक करून काय उपयोग ! उरीं पाषाण बांधून महाडोहांत उडी घालून जशी काळाला बळंच मिठी द्यावी, तसं आपण साधुसंतांची नित्य हत्या करून हा अनर्थ बळंच किहो घरांत आणलांत ! महाराज ! विष्णुभक्तहत्येचें घोर पाप राज्यांत माजल्यावर मग अनर्थ्यांना काय हो उणं ? महाराज ! मी आपलीं नानाप्रकारानं प्रार्थना करीत असतां, आपण संतहिरे सांडून दुर्जनरूपी गारीचा आजवर