पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/152

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. संग्रह केलांत ! संतराजहंसाना दूर लोटून पापबुद्धे मंत्रीदिवाभीतांना पाळलंत ! संतकल्पद्रुम राज्यांतून उपटून टाकून दुरात्मेअमात्यरूपीं कंटकांचं वन वाढविलंत ! तेव्हा हे घोर पाप देवाला सहन न होऊन, माझ्या थोर पूर्व पुण्याईनं लाभलेलं हे माझं गुणनिधान काळानं आज ओढून नेलं! यमानं हें राजवंशवल्लीचं रोप उपटून टाकून हा माझा कल्पवृक्ष तोडून किहो टाकला ! नी हा दिव्य कुलदीप आज मालवून सर्व राज्यांत अंधार पाडला! महाराज ! हा गुणराशी बाळ, सगळ्या नगरीचा प्राण किहो होता? हा प्राण निघून गेल्यामुळे हे सर्व नगर आतां स्मशानवत् झालं ! आतां या नगराला अग्नि लावून, हे दुःखरूपीं राज्य जन्मवेरी भोगा बरं ! | रामराजा- देवी ! माझे हृदय अगोदरच फाटून गेले आहे त्यावर हा असा वाक्प्रहार करून ते शतशः विदीर्ण करूं नकोग ! परमेश्वराने हे दिव्य अंजन माझ्या नेत्रांत घातल्यामुळे, माझ्या पापाच्या कोटिराशी यावेळी माझ्या नेत्रांपुढे मला ढळढळीत दिसत आहेत ! अहो पुराणपुरुषा भगवंता ! मी अनंत अपराधी आहे ! मला क्षमा करा ! आणि हे एवढं पुत्रदान मला या ! || सीताबाई- महाराज ! आपल्या हाकेला देव आतां कुठली हो हाक देणार ! माझ्या जिवींच्या विसाव्या बाळकृष्णा ! तुझे गुण मी आता किती २ आठवू ! जन्माला आल्या दिवसापासून तू कधी हट्ट केला नाहींस ! कधी मला शिणविलं नाहींस ! की कधी मला दुःख दिलं नाहींस ! उलट, आई ! तू फार दमलीस ! तूं फार भागलीस ! मी तुझे पाय रगडतों ! मी तुझी सेवा करतों ! असं ह्मणून तान्ह्या, तू आपल्या चिमकुल्या हातांनी माझे पाय किरे दाबीत होतास ! पण बाळा ! आता मला तू दमलीस असं कोण रे ह्मणेल ? माझं पुण्य इतकंच होतं ते संपलं ह्मणून का रे मला सोडून तू एकटाच निघुन गेलास ? बाळा ! माझ्याशीं एक शब्द तरी बोल रे ! तुझं हे सुकुमार गोजिरं मुख पाहून माझी तहानभूक किरे हरपत होती ! नी तुझं कौतुक