पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/153

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४था. १४५ करून मी आपल्याला धन्य ह्मणवीत होते ! पण बाळा, आता उद्या मी कोणाचं रे मुख पाहूं ! माझ्या पाडसा, तुझे हे अलंकार आता मी कोणाला घालू ! नी मी आता कोणाला रे भरवू ! महाराज ! माझं हे गुणाचं बाळ मला परत आणून द्या हो ! हा माझा प्राण निघून गेल्यावर मी कशी जिवंत राहूं ! महाराज ! यावेळी मी चाकणेस बाबांच्या घरी असते, तर त्यांनी कोणातरी संतश्रेष्ठांना घरी आणून, त्यांच्या करवीं स्वर्गीचं अमृत माझ्या बाळाच्या मुखांत बालविलं असतं ! नी माझा वाळ मला परत देवविला असता ! पण महाराज ! ही गोष्ट आपल्या हातून कुठली व्हायला ? महाराज ! कांहीं तरी उपाय करून, या माझ्या बाळाला ह्या कृतांतपाशांतून सोडवा हो ! ( बेशुद्ध होऊन निचेष्टित पडते. ) रामराजा-( सीताबाईस सावरून ) देवी ! काय ग ही तुझी अवस्था झाली । देवा ! या वेळी हे माझे प्राण एकदम निघून जातील तर फार बरे होईल! ( इतक्यांत राजकुलगुरु शकविव्हळ होऊन प्रवेश करतात. राजा उठून पुढे होऊन त्यांस नमस्कार करतो. ) गुरुमहाराज, अशा या संकटसमयीं मी कोणाला शरण जाऊँ ? मला पातक्याला कोण संतश्रेष्ठ आता पाठीशी घालून, माझी या घोर साधुशापापासून मुक्तता करील ? या अभाग्याकडे आता कोण कृपादृष्टीने पाहील? माझ्या हाकेला आता कोण हाक देईल ? आणि या संकटीं माझे कोण रक्षण करील ? गुरुमहाराज, मी आतां कोणाचे पाय धरूं ? आणि कोणाजवळ करुणा भाकू ? | राज कुलगुरु- राजा, ब्रह्मानंदस्वरूप, पूर्णज्ञानी, संतमुकुट मणी, ज्यांच्या दर्शनानेच अज्ञानांना ज्ञान प्राप्त होते, ज्यांच्या स्मरणाने कळीकाळाची बाधा नष्ट होते, आणि ज्यांच्या अनुग्रहाने मोक्षपीठ हाती येते, असे मानवदेहाने या कलियुगीं भूतलावर अवतरलेले कैवल्यदानी साक्षात् लक्ष्मीकांत श्रीविष्णु, ज्ञानेश्वरमहाराज, विश्वोद्धाराकरितां सांप्रत सर्व पृथ्वीवर हिंडत असून ते तूर्त या कन्हाड नगरीसमीप आले • पश्चात्तापयुक्त अंतःकरणाने त्यांना शरण जाऊन त्यांचे चरण धरः आहेत ! तर राजा ! पूर्ण १३ ।