पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/154

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. आणि त्यांची प्रार्थना करून त्यांना घरी आणून भक्तिभावाने त्यांचे पूजन कर; आणि त्यांचा शेषानप्रसाद भक्षण कर; ह्मणजे तू सर्व संकटांतून मुक्त होशील ! राजा, या जगद्गुरूंचा महिमा तुला काय सांगावा ? अरे, त्यांचे ते आनंदवन स्वरुप तू नेत्रांनी पाहशील तर तुला तुझ्या देहाचा विसर पडेल! त्यांच्या चरणपद्माचें तू हृदयीं ध्यान धरशील तर तुझे चित्त जागच्या जागी मुरून जाईल ! आणि त्यांचे प्रेमानें पूजन करून त्यांचे चरणतीर्थं घेशील, तर तू जन्ममृत्यूच्या फे-यांतून मुक्त होशील ! राजा, सहस्ररश्मा भगवान् सूर्यनारायण उदयाचलीं येतांच, जसा लहानथोर भाव मनांत न आणतां तो सर्वांना सारखाच प्रकाश देतो, तसे हे जगद्गुरु श्रीज्ञानेश्वरमहाराज जातिकुळाचा आणि हीनश्रेष्ठाचा भाव मनांत न आणतां सकल जीवांना पाठीशी घालून या भवसागरांतून पैलपार नेतात ! यासाठी अशा ह्या परात्पर सङ्गुरुंना एकवार तरी नेत्रांनी पाहून, राजा, तू कृतार्थ हो ! कारण, अशा मोक्षदानी सद्गुरूंची भेट या नरजन्मांत गांठी थोर पुण्य असेल तरच होते ! आणि अशा सद्रूंचे दर्शन झाले तरच, राजा, मानवदेहाचे सार्थक होते ! | रामराजा-गुरुमहाराज, ही आपली अनुज्ञा आज या अभाग्यावर सुखाचा सागर लोटल्याप्रमाणे मला वाटत आहे ! दरिद्याला जसा धनाचा कूप सांपडावा, किंवा रोग्याला जसे दिव्य रसायण सांपडावे, किंवा मृताला जसे अमृतफल सांपडावे, त्याप्रमाणे या वेळी हे आपले वचनामृत मला लावले असून, तुमच्या कृपेने मला अंधाला आज नयन आले आहेत ! तरी गुरुमहाराज, मला बरोबर घेऊन जाऊन, जगद्गुरूंच्या चरणांवर मला घाला ! मी घोर पातकी आहे, तेव्हां जगदुरुपादरजस्पर्शाचे सुख मला मिळवून देण्यास, आपल्यासारखे पुण्यशील आणि पूर्णज्ञानी कुल गुरुच यावेळी पुढे झाले पाहिजेत ! राजकुलगुरु-राजा, अशीच तुझी इच्छा आहे, तर चले। माझ्याबरोबर ! । रामराजा-कमळे, आह्मी परत येईपर्यंत बाळाचे आणि