पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/155

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. ૬૪૭ देवीचे चांगले रक्षण करा. चलावें, गुरुमहाराज ! ( रामराजा व राजकुलगुरु निघून जातात. ते निघून गेल्यावर सीताबाईला शुद्धीवर आणण्याकरितां कमळा, पिंगला व गिरजा तिच्या डोळ्यांना पाणी लावून, तिला वारा घालतात व कमळा मधून मधून सीताबाईला, ‘बाईसाहेब ! अहो बाईसाहेब !' अशा हाका मारते. अशा हाका चालू असतां सीताबाई, एका हाकेच्या वेळेस सावध होऊन डोळे उघडून उठून बसते. ) सीताबाई- कमळे, अग मला चांडाळणीला चांगली काळझोंप किग लागत होती ! तींतून मला कशाला ग जागी केलीस ? ( इकडे तिकडे पाहिल्यावर रामराजा तेथे नाही असे दिसल्यावर ) कमळे ! माझ्या बाळाला सोडून महाराज कुठे गेले ग ? । | कमळा- बाईसाहेब, राजकुलगुरूंना बरोबर घेऊन, महाराज श्रीसद्गुरु ज्ञानेश्वरमहाराजांना इकडे घेऊन यायला गेले आहेत ! त्यांना गेल्याला बराच वेळ झाला ! ते श्रीसद्गुरुंना घेऊन आता परत येतील! सीताबाई-कमळे, कसं ग हे माझं विपरीत दैव ! की श्रीज्ञानेश्वरमहाराज वाड्यांत येण्यापूर्वीच आमच्या कुळीं अंधार पडला ! अहो भगवंता गोपालकृष्णा, मी तुमचं आजवेरी भावभक्तीनं पूजन केलं! तुमची एकनिष्ठेनं सेवा केली! त्याचं हेच का हो फळ तुह्मीं मला दिलंत ? हे भगवंता ! तू दीनदयाळ, अनाथांचा नाथ ह्मणवितोस ! नी यावेळींच तुझं हृदय असं कसंरे कठीण झालं ! कमळा-बाईसाहेब, देवाच्या करणीचा अंत कुणालाही लागत नाहीं ! देवानंच मनांत आणलं, तर तो युवराजांना अजून दीर्घायु करील ।। सीताबाई-कमळे, तू अगदी वेडी आहेस ग ! अग वुळे, आपल्या भक्तांना संकटों लोटण्याचं भगवंतांचं ब्रीद कांहीं आज चंच नाहीं ग ! उदार भक्त श्रियाळ याचं पोर भगवंतांनीच मारलं ? शिबीरायाचं शरीरमांस रती रती काढलं ! भक्तश्रेष्ठ मयूरध्वजाच्या मस्तकीं करवत चालवून त्याचं शरीर दुभंग केलं ! धैर्यवं