पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/156

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. त दक्षबाळाला पाताळी नेऊन घातलं! दुर्वास ऋषींच्या मागं सुदर्शन लावलं ! नी राजा दशरथाला भगवंतांनी राम ! राम ! ह्मणन प्राण सोडण्याला. किंग लावलं! त्याची देखील त्यांना दया आली नाहीं! अग, या श्रीरंगांनी प्रत्यक्ष आपल्या सख्ख्या आईचा देखील किग प्राण घेतला! तेव्हा त्या निष्ठुर भगवंतांना या दोन गाईची ग या वेळी कुठली दया यायला ! कमळे, माझ बाळ भूक लागली ह्मणून किंग ह्मणत होतं ! बाळा, तेव्हां मीं तुला चाळवलं, म्हणून का रे मजवर रागावलास ? बाळा, तुला साधुशाप बाधू नये ह्मणून श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पादरजाची तुला तीट किरे लावली ! हे चतुरा ! सुंदरा ! सुगुणा ! माझ्याशी एकतरी शब्द बोल किरे ! बाळा, माझी उपेक्षा कारे केलीस ? तुझ्यावांचून मी अनाथ दीन किरे झालें आहें ! कमळे, हे माझं दिव्यरत्न हारपल्यानं माझं घर बुडालं ग ! बाळा, तू परलोकीं गेलास हे पाहून संतराज या तुझ्या मातेच्या हातून कशारे पूजा घेतील ? नी आपल्या घरचं अन्न कसं रे ग्रहण करतील? ते विन्मुख गेले ह्मणजे माझ्या तान्ह्या आपली त्रैलोक्यांत किरे अपकीर्ति होईल! लोक आपली निंदा करतील ! पाडसा, हैं। कसं रे नाहीं तुझ्या ध्यानांत आलं ? सख्या, माझी माया सांडून तू स्वर्गाला एकट्यानंच जायची कां बरं घाई केलीस ? हे राजवंशतलका ! माझ्याशी कांहींतरी बोल किरे! मी तुला इतकी हाका मारते आहे, मी तुझी इतकी विनवणी करते आहे, तरी तू मला कां रे ओ देत नाहींस ? बाळा ! तुझे गुण संतश्रेष्ठांना फार आवडले! नी ह्मणून कां ग कमळे माझ्या बाळाला दृष्ट झाली ? बाळा ! आतां तुला देवाच्या पायापाशीं कोणाची दृष्ट न लागो । माझ्या उदरीं येऊन तू व्यर्थ शिणलास ! पण आतां वैकुंठीं देवा च्या घरी तू सुखांत राहा ! बाळा, अखेरीला तू संतपूजनाची नी = संतभोजनाची इच्छा मनांत धरली होतीस ! ती तुझी इच्छा संत घरी आले झणजे पुरवून, तुझ्या मागून माहीं वैकुंठी येते ! कमळे, संत घरी येईपर्यंत मी माझ्या तान्ह्याला मांडीवर थोपटून अखेरचं गाणं ह्मणून घेते ! राजसा ! आतां मागची सारी आठवण विसर