पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/158

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० श्रीज्ञानेश्वरमहाराज. रामराजा-( सीताबाई मूच्छित पडलेली पाहून ) कमळे, देवी अजून शुद्धीवर आली नाहीं ना ? हाय रे अभाग्या रामराजा ! आपल्या दुष्कृताच्या वन्हिज्वाळेत सकल राजकुल किरे दुग्ध करून टाकलेंस ! गुरुमहाराज, कायहो माझे हे बलवंत पूर्वकर्म ! | राजकुलगुरु- राजा, हें पूर्वकर्म सर्वांहून बलिष्ठ आहे । याच पूर्वकर्माने श्रीरामचंद्र प्रभूना रानौरान हिंडावयास लाविलें! याच कर्मामुळे महासती जानकी मातोश्रीला रावणाने चोरून नेली ! याच कर्माने ब्रह्मा, विष्णु, महेश, यांना या भूतलावर अवतार घ्यावे लागले! याच्याचमुळे भस्मासुराचे तोंड काळे झालें ! याच्याचमुळे भगवान् श्रीकृष्णाला काळयवनापुढे पळावे लागलें ! मदनाचा देह पूर्वकर्मानेच दग्ध झाला ! आणि याच पूर्वकर्मामुळे सकल यादवांचा कुलक्षय झाला ! असे किती दाखले देऊ ? राजा, हे पूर्वकर्म आजपर्यंत कधी कोणाला सुटलें नाहीं ! | रामराजा- कमळे, आह्मी मघांशी येथून गेल्यापासून हा वेळपर्यंत देवी एकदां देखील शुद्धीवर आली नाहीं का ग ? | कमळा- महाराज, आपण इथुन गेल्यावर बाईसाहेबांना शुद्धीवर आणण्यासाठी आह्मीं पुष्कळ यत्न केले. तेव्हां ब-याच वेळानं त्या एकदांच्या शुद्धीवर आल्या. नी मला चांगली काळझोंप लागत होती, तींतून मला कशालाग जागी केलीस, असं मला ह्मणाल्या, नी मग युवराजांचे मस्तक मांडीवर घेऊन, त्या मोठमोठ्यानं आक्रोश करू लागल्या! बाळा, संतमहाराज आतां घरीं आले, नी त्यांनी तुझी ही दशा पाहिली, म्हणजे ते विन्मुख किरे परत जातील! नी ते परत गेले ह्मणजे जगांत लोक आपली निंदा किरे करतील! एक ना दोन अशा हजार गोष्टी त्या युवराजांना म्हणू लागल्या ! नी मग त्या शोकाच्या लहरींत युवराजांना थोपटून गाणं म्हणू लागल्या. गाणं ह्मणता म्हणता त्यांना पुन्हा मूच्र्छा आली, नी त्या आता इतक्यांत बेशुद्ध झाल्या! - रामराजा- गुरुमहाराज, देवीची ही भयकंर स्थित पाहून माझे हृदय दुभांग होत आहे ! गुरुमहाराज, श्रीसद्गुरुज्ञानेश्वरमहाराज येथे येऊन त्यांनी बालकाची आणि देवीची ही अवस्था