पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/159

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था.. १५१ पाहिली, ह्मणजे ते रागावून माझ्या हातून पूजा ग्रहण न करता, मला हतभाग्याला या दुःखडोहांत असाच पचत टाकून जाऊ लागले, तर मग मी काय करू हो ? । | कमळा- महाराजांनीं सद्रूंना या वेळी असंच सांगितलं पाहिजे की, युवराज एकाएकीं गच्चीवरून खाली पडले, नी त्यांना भयंकर मूच्र्छा आली ! पुष्कळ उपाय केल्यावर ते शुद्धीवर आले, नी बाईसाहेबांच्या मांडीवर ते आतां इतक्यांतच झोपी गेले आहेत ! बाईसाहेबांना आज फार शीण झाला, नी त्यामुळे त्यांचाही बसल्याजागीच हा आतांच डोळा लागला आहे ! असं महाराजांनीं सद्रूंना सांगितलं, ह्मणजे महाराजांच्या हातून पूजा घेण्यापूर्वी सद्गुरु इथून निघून जाणार नाहींत ! रामराजा-हर ! हर ! सद्गुरुसमर्थ श्रीज्ञानेश्वरमहाराज माझ्यापुढे उभे राहिल्यावर, त्यांच्यापुढे देखील या दैवघातक्याला खोटे बोलण्याची वेळ आली ना! तेव्हां गुरुमहाराज, आपण ह्मणत त्याप्रमाणे पूर्वकर्म सहनही बलिष्ठ आहे, हेच खरें ! ( इतक्यांत राजोपाध्ये येऊन श्रीज्ञानेश्वरमहाराज आल्याचे सुचवितात. रामराजा व राजकुलगुरु त्यांस सामोरे जातात. रामराजा श्रीज्ञानेश्वरमहाराजांस हातीं धरून उच्चासनावर आणून बसवितो. राजकुलगुरु नामदेवादि संतांस श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या आसनाभोंवतीं आणून बसवितात. राजोपाध्ये रामराजास पूजासाहित्य आगून देतात. रामराजा श्रीज्ञानेश्वरमहाराजांची पूजा करण्यास आरंभ करणार इतक्यांत ) ज्ञानेश्वर-हे राजश्रेष्ठा! मातोश्री सीताबाईला आणि श्रीकृष्णस्वरूप बाळकृष्णाला इकडे घेऊन या ! झणजे त्यांना डोळेभरून पाहून आह्मी कृतार्थ होऊ ! रामराजा-(कंठ दाटून येऊन) सद्गुरुमहाराज ! मी शिकारीला गेलों असतां, दोन घटकांपूर्वी माझा बाळकृष्णा गच्चीवरून पडून बेशुद्ध झाला होता ! तेव्हां देवीनें, आणि तिच्या सखीव दासीजनांना पुष्कळ उपचार करून, बाळकृष्णाला शुद्धीवर आणलें! सांप्रत तो पहा तेथे देवीच्या मांडीवर नुकताच झोंपी गेला आहे, आणि