पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/16

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज. पणाचं व्रत झेपेनासं झालं, बाईल हवीशी वाटू लागली नी संसाराची हाव सुटली, तेव्हां संन्यास टाकून पुन्हा प्रपंचांत शिरलेला मेला बोका संन्याशी हा विठ्ठलपंत !नी अशा आचारभ्रष्टाच्या पोटी जन्मास आलेली अवकळी कारटीं ! जरूं नांवदेखील घेऊ नये मेल्यांचं ! नी अशा मेल्यांना म्हणे देवाचे अवतार ! वल्लरी, देवाची सेवा व्हायची जक्की दूरच राहिली, पण अशानं देवाची निंदा मात्र घडते, दुसरं कांहीं नाहीं ! | वल्लरी- ( घागर पुन्हा कमरेवर घेण्याकरितां पदर सावरीत ) माझे विठूभाऊजी संन्यास टाकून पुन्हा संसार करूं लागले, ते का त्यांना बायकोचा लोभ सुटला ह्मणून का ? तुझ्या नाहीं बाई जिभेला हाड, तेव्हां तू काय वाटेल ते ह्मणशील ! अग, वाराणशींतले विठूभाऊजींचे गुरु, श्रीपाद रामानंदस्वामी, यांनी सांगितलं हो विठूभाऊजींना पुन्हा संसारांत शिरायला ! नी गुरूंची आज्ञा मोडायची नाही, ह्मणूनच ते पुन्हा प्रपंच करू लागले ! उत्तरा- (लुगडे धोंड्यावर आपटून ) अग जान्हवी, तुला आहे का डाऊक १ वाराणशींतल्या कबीर मुसलमानाला शिष्य करून त्याला उपदेश याच रामानंदस्वामींनी केला म्हणतात हो ! या मेलाला म्हणे जातीचा भेदाभेदच नाहीं ! मग उजूच आहे, जसे गुरु तसे शिष्य ! | जान्हवी-( घडी केलेले लुगडे पायावर आपटतां आपटतां ) उत्तरे, परवाच गोष्टींवरून गोष्टी निघाल्या होत्या, तेव्हां आमच्या सासूबाई सांगत होत्या की, या विठ्ठलपंताचे वडील गोविंदपंत नी आई निराबाई, हीं बरीक दोघंही देव-माणसं होतीं ! नी सारं आपेगांव त्यांना फार नावाजीत असे ! पण म्हणतात ना, तुळशीच्या पोटीं भांग ! ' तसा हा विठ्ठलपंत त्यांच्या पोटीं कुलांगार जन्माला आला ! | उमिळा- ( तांदूळ आसडतां आसडतां ) पण या मेल्या विठ्यानं आदल्या जन्मीं कोणाचा तरी संसार उभा केला होता; ह्मणून अलंकापुरींतला गरीब बिचारा कुळकरणी सिदोर्पत, याला असल्या धटिंगणाच्या गळ्यांत आपली एकुलतीएक पोर बांधायची