पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/162

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. बालकांना मृत्यु येतो, असे किरे सारे जंगै ह्मणेल ! हे देवाधिदेवा नारायणा, तुझ्या भक्तांना घरी आणले असतां, थोर अनर्थ उद्भवतात, अशी आमची अपकीर्ति सर्व जगांत पसरून आह्मांला कोणी पुढेदेखील उभे राहू देणार नाहीं ! आमचा सर्व लोक उपहास करतील! हे सावळे कान्हाई कृष्णाबाई, ही विपरीत करणी कशीग केलीस ! हे जगदुद्धारा, वैकुंठनायका, या बालकाला आह्मीं दीर्घायुभव असा किरे आशीर्वाद दिला ! ते आमचे वचन तू आज असेच कारे खरें केलेंस ? हे मायाचक्रचालका भगवंता, मागील युगीं तूं भक्तवचनासाठीं अनंत रूपे आणि अनंत नामें धारण करून, अनंत अवतार घेतलेस ! आणि अनंत लीला करून दाखवून, आपल्या भक्तांचा लौकिक वाढविलास ! असे असून, देवा, यावेळीच कारे अशी निष्ठुरता धारण केलीस ! हे इंदिरावरा माधवा, प्रल्हादाकरितां तू स्तंभ प्रगटलास ! उपमन्यूला क्षीरसागर दिलास ! धुवाला अढळपदीं स्थापिलास ! नारदाला ब्रह्मशापापासून सोडविलंस ! गजेंद्राला संकटी पावलास ! अहल्येला पाषाणदेहापासून उद्धरलीस ! पार्थासाठी कळवळून, जें, तुझे स्वरूप विधीने आणि देवांनीही कधी पाहिले नाही, असे आपले विश्वरूप त्याला दाखविलेंस ! पांचाळीला संकटीं लुगडी पुरविलींस ! हे भक्तकामकल्पद्रुमा देवा, हे तुझं ब्रीद सकल विश्व आतां मिथ्या किर ह्मणेल ! है अनंत कल्याणदायका पंढरीशा, तुझ्या अनंत युगाच्या कीतला हे उचीत आहे कारे ? हे विश्वमतिचालका पंढरीनाथा, तूं दीनदयाळ, पतितपावन, अनाथनाथ, भक्तकैवारी, संकट वरदान आहेस, ह्मणून तुझे पोवाडे आह्मी नित्य जगापुढे गातों, ते अशाच करितां कायरे ? हे अजाजता, गुणातीता, तू विश्वात्मा, आह्मां भक्तांना तातजननी, असे असून हे प्रभो आतांच कारे आम्हांवर निष्ठुर झालास ? अहो भक्तप्रियकरा पांडुरंगा, आम्हांवर दया करा, आणि या बालकाच्या मुखात अमृत आणून घालून याला जिवंत करा ! आणि आम्हां भक्तांचा लोकिक कायम राखा ! हे सकल देवपालका, तुला शरण आल्यावर