पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/163

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. १५५ आम्हां भक्तांवर आपदा आली, तर तुझ्या ब्रिदाला उणेपणा किरे येईल! हे दयाघना नारायणा, तू आम्हां भक्तांचे निजधन । आह्मां भक्तांची विघ्ने स्वतः आंगीं सोसून, आम्हां दासांचें तू रक्षण करतोस, आणि आमचा हट्ट पुरवून आमची प्रौढी वाढवितोस ! ही तुझी भक्तवत्सलता आता कोठेरे गेली ? हे दयावना, आम्हांसाठीच आतां कारे कृपणता धरलीस ? हे भक्तभूषणा पंढरीशा, तू पूर्वी गुरुपुत्र परत आणून दिलास ! तसेच त्यावेळीही आह्मां भक्तांच्या धावण्या धावून आमचे यश राखावें ! दवा, हे पाहा सर्व संत दीनवदन करून बसले आहेत ! यांची लज्जा रक्षण करणें, देवा तुझ्याकडे आहे ! नारायणा, मी तुला इतका आळवीत असतां तुला माझी अजून कारे करुणा येईना १ हे द्वारकाधीशा, तू आजच कारे इतके कठीण मन केलेंस ? का हे पांडुरंगा, यावेळी ते पंढरपुरी प्रेमळ भक्तांच्या कीर्तनश्रवणांत गुंग होऊन गेला आहेस ? का देवा, योग्यांच्या ध्यानांत गुंतला आहेस ? का आणीक कोणीं भक्ताने तुला याच वेळी संकट घातल्यामुळे तिकडे घांवून गेला आहेस ? का हे अधोक्षजा, सगुण उपासकांची पूजा घेत बसला आहेस ? का इंद्र तुला अमृतपान करविण्याकरितां घेऊन गेला आहे ? का पंढरीस तुझ्या भक्तांना दर्शन देण्यांत गुंतला आहेस ? का रुक्मिणी मातोश्रीजवळ निद्रिस्त झाला आहेस ? अहो संत हो, नामप्रल्हादुउच्चारी ॥ तयासोडवीनरहरि ॥ उचलुन घेतलाकडियेवरी ॥ भक्तसुखेनवाला ॥ १ ॥ नामवरवयावरवंट ॥ नामपवित्रचोखट ॥ नामस्मरेनीळकंठ ॥ निजसुखनवाला । ध्रु० ॥ जेधुरुसआठवलें ॥ तेंचि उपमन्येघोकिलें ॥ तेंचिगजेंद्रालाधलें ॥ हितझालेतयांचें ॥२॥ नामस्मरेअजामेळ ॥ महापातकीचांडाळ ॥ नामेंझालासोज्वळ ॥ आपणासहितनिवाला ॥ ३ ॥ वाटपाडाकोळिकु ॥ नामस्मरेवाल्मिकु ॥ नामेंउद्धारलोतिन्हीलोकु ॥ आपणासहितानवाला ॥ ४ ॥ ऐसे