पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/164

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. अवंतअपार ॥ नामेतरले चराचर ॥ नामपावत्रआणिपारिकर ॥ रखुमादेविवराचें ॥ ५ ॥ ह्मणून आता आपण विठ्ठल नामाचा टाहो फोडून भगवंताला आळवू ! म्हणजे तो भक्तकैवारी दयाघन प्रभु आपल्याकडे वळून आपला हट्ट पुरवील ! आणि या बालकाला जीवदान देऊन, आपली लज्ञा रक्षण करील ! ( श्रीज्ञानेश्वरमहाराज, नामदेवादि संत रामराजा, राजकुलगुरु व कमळा विठ्ठल नामाचा गजर करतात; व हा गजर चालू असतां, श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या नेत्रांतून वाहणारे अश्रु बाळकृष्णाच्या उघड्या तोंडांत टपटप पडत असतात. हे अश्रु बाळकृष्णाच्या तोंडांत पडू ल गल्यावर, तो हळू हळू झोपेतून जागा झाल्याप्रमाणे सावध होऊ लागतो; व अमळशाने उठून बसून श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या मुखाकडे पाहून त्यास कडकडून मिठी मारतो. तेव्हां विठ्ठलनामाचा गजर बंद करून, श्रीज्ञानेश्वरमहाराज बाळकृष्णाला हृदयाशी घट्ट धरितात.) हे भक्तवत्सला श्रीपांडुरंगा !' या बालकाला जीवदान देऊन, तू आम्हां भक्तांचा माथा आज उजळ केलास, तेणेकरून आम्ही धन्य झालों ! बाळा ! तो तुझा तात देहभान विसरून, तेथे स्तब्ध उभा राहिला आहे ! तर त्याला भेटुन धन्य हो ! बाळकृष्णा- ( रामराजाकडे धांवत जाऊन व त्याच्या कमरेस मिठी मारून ) तातमहाराज ! मजवरचा तुमचा राग अजून गेला नाही, आणि म्हणूनच काहो तुम्ही असे कष्टी होऊन उभे राहिला आहाँ ? तातमहाराज ! आतां मजवरचा राग सोडून मला जवळ घ्या किहो ! ( रामराजा देहावर येऊन बळकृष्णाला आनंदाने उचलून पोटाशी घट्ट धरितो व त्याचे चुंबन घेतो. इत: क्यांत बाळकृष्णाची दृष्टि सीताबाईकडे जाते ) तातमहाराज ! तुह्मी माझ्या आईला कांहीं कठोर भाषण बोललां, ह्मणून काहो ती विव्हळ होऊन अशी भुईवर आंग टाकून तेथे पडली आहे ? रामराजा-( गर्हिवर दाटून येऊन बाळकृष्णाचे पुन्हा चुंबन घेऊन ) बाळा ! यावेळी माझ्या अत्यानंदाचा कळस झाल्यामुळे